8375 views
वडगाव मावळ दि.21 (प्रतिनिधी) मावळ नवलाख उंब्रे प्रसिद्ध बैलगाडा मालक मॉगी बैलाचे मालक पंडित रामचंद्र जाधव वय 52 रा.जाधववाडी नवलाख उंब्रे ता.मावळ जि.पुणे. यांचा खंडणीसाठी अपहरण करून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला. सुरज वानखेडे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंडित जाधव यांना आरोपी सुरज वानखेडे सह इतर साथीदारांनी
दि.14/11/24 रोजी 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केले होते. त्यानंतर म्हाळुंगे पोलीस स्टेशनच्या शिवे वागाव हद्दीत खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला.आरोपींनी मयत पंडित जाधव यांच्या मोबाईल वरून त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर वारंवार मी बैल खरेदीसाठी बाहेर आहे. मला 80 लाखांची गरज आहे. निवडणूक आहे मतदान झाल्यावर येतो असे वारंवार मेसेज पाठविले होते. त्यामुळे मयत पंडित जाधव यांच्या कुटुंबियांना काहीच निर्णय घेता येईना, अखेर गुरुवारी (दि.21) सकाळी या खुनाच्या गुन्ह्याची उकल खंडणी विरोधी पथकाकडून उघडकीस करण्यात आली. आरोपी हा मयत यांच्या गाडीवर चालक होता. यातील आरोपी मागील 15 वर्षांपासून मयत यांच्या ओळखीचे होते. आरोपींनी गुन्हा का केला याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव करत आहेत.
सविस्तर बातमी काही वेळात