1038 views
वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यातील वनपरिक्षेत्र शिरोता हद्दीत उकसान-शिरदे परिसरात सोमवारी (दि.15) सकाळी बिबट हा वन्यप्राणी असल्याचे समजताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट पुणे टीमने धाव घेऊन बिबट्याला पकडून वैद्यकीय उपचारासाठी पुणे येथे रवाना केले.
मावळात बिबट्या आढळल्याच्या अनेक बातम्या ग्रामस्थ सांगत असून कुत्री, वासरे व जनावरांवर हल्ले केल्याच्या घटना समोर येत होत्या. वनविभागाने यशस्वीपणे बिबट्या पकडून नेल्याबाबत वनविभागाचे कौतुक होत आहे. ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी तत्काळ पोहचून परिसर पाहणी केली असता; बिबट प्राणी एका चारा साठवलेल्या गोठ्यामध्ये असल्याचे आढळन आले. सदर बिबट कदाचित अस्वस्थ असल्याचे तज्ञ पशुवैद्कीय डॉक्टर यांच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्या अनुषंगाने वन विभाग व रेस्क्यू टीम यांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याचे यशस्वीरित्या रेस्क्यु करण्यात आले. बिबट्यास पुढील तपासणी आणि उपचारासाठी वन्यप्राणी उपचार केंद्र पुणे येथे तत्काळ पाठविण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मुख्य वनसंरक्षक पुणे एन आर प्रविण , उप वनसंरक्षक पुणे महादेव मोहिते, (उपवनसंरक्षक पुणे), सहाय्यक वनसंरक्षक मयुर बोठे यांचे मार्गदर्शनाखाली शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.सुशील मंतावार यांच्या नियंत्रणात वनपाल मंजुषा घुगे, वनरक्षक गजेंद्र भोसले, युवराज साबळे, दिपक उबाळे, सुरेश ओव्हाळ,शंकर घुले तसेच रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट चे सोनेश इंगोले, चेतन वंजारी,पूर्वा निमकर,नरेश चांडक, सायली पिलाने, वैष्णवी भांगरे, सागर शिंदे, केतन वैद्य आदींनी यशस्वीरीत्या बिबट्याला पकडून व्यवस्थित वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले.
सदर कामगिरीबद्दल वनविभागाचे मावळ परीसरात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.