766 views
तळेगाव दाभाडे दि.3 (प्रतिनिधी)कंटेनर मध्ये काथ्याच्या खाली 11,490 किलो रक्तचंदन घेऊनबे ग्लोर ते मुंबई दिशेने जात असताना, रविवारी (दि.2) सायंकाळी 4 वा. उर्से जुना टोलनाका फूडमॉल समोर ता.मावळ जि.पुणे हद्दीत मालमत्ता गुन्हे विरोधी पथक व शिरगाव परंदवडी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. यात दोन आरोपी अटक असून 9 कोटी 11 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हा दाखल सोमवारी (दि.3) पहाटे करण्यात आला.
रक्तचंदन तस्करी करणाऱ्या पुष्पा चा माल पोलिसांच्या हाती;
राजाराम गंगाराम गायखे (वय 37, रा. काळेवाडी, ता. पारनेर, जिल्हा अहिल्यानगर ) व हरप्रीतसिंग धरमसिंग बदाना (वय 42, रा. विराज रेसिडेन्सी, सी विंग, फ्लॅट नंबर 303, बदलापूर, वेस्ट, ठाणे) यांना अटक केली आहे. इतर साथीदार फरार आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
बेग्लोर ते मुंबई दिशेने एम एच 43 वाय 0742 कंटेनर मधून रक्तचंदन तस्करी करत असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथक व शिरगाव परंदवडी पोलिसांनी सापळा रचून उर्से टोलनाका फूडमॉल समोर कंटेनर चौकशी केली असता, आरोपी राजाराम गायखे व हरप्रीतसिंग बदाना यांची चौकशी केली व कंटेनरची झडती घेतली असता, काथ्या च्या खाली रक्तचंदन लपवून तस्करी करत असल्याने आरोपी कंटेनर व मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी व इतर साथीदार यांनी आपापसात संगणमत करून त्यांचा उद्देश साध्य करण्याकरिता स्वतःच्या फायद्या करिता कंटेनर क्रमांक MH 43 Y 0742 यामधून 8,61,75,000/- रुपयाचा प्रतिबंधित विनापरवाना बेकायदा 11,490 किलोग्रॅम वजनाचे रक्तचंदना च्या ओलसर लाकडाची अज्ञात ठिकाणाहून तोडून बेकायदेशीर वाहतूक करताना मिळून आले आहेत त्यांचेकडुन एकुण रक्कम रु. 9,11,91,000/- चा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी क्र. १ व २ यांचेवर BNS कलम 303(2), 3(5) भारतीय वन अधिनियम कलम 26, 41, 42 सह महाराष्ट्र खाजगी वृक्षतोड अधिनियम 1964 सुधारणा कलम 3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.