कुत्र्यांच्या हल्ल्यातून भेकराचे (हरिण) वाचवले प्राण

455 views

वडगाव मावळ दि.25 (प्रतिनिधी) थुगाव येथे अन्न व पाण्याच्या शोधात नगरीवस्तीत आलेल्या भेकरावर कुत्र्यांनी हल्ला केला, यात जीवाच्या आकांताने धावत असणाऱ्या भेकराचे प्राण येथील माजी ग्रामपंचायत सदस्य द्वारका किसन तरस व कमळ प्रसाद तरस यांनी वाचवले. जखमी भेकरावर प्राथमिक उपचार केले.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 week ago
Date : Tue Mar 25 2025

image



किसन तरस, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांचे बंधू रामनाथ गराडे यांनी या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांना फोन द्वारे दिली. तसेच भेकर रेस्क्यूसाठी वन परिमंडळ अधिकारी दया डोमे वनरक्षक आशा मुंडे, वनसेवक विशाल सुतार तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहोचले व त्या भेकरास ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी पुणे भुगाव रेस्क्यू सेंटरला पाठविण्यात आले आहे.


अशी माहिती संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांनी दिली व कुठेही वन्यजीव आढळल्यास टोल फ्री क्रमांक 1926 या नंबर वर फोन करावा किंवा वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचा 9822555004

या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.


त्यावेळेस शिवसेना उप विभागप्रमुख किसन तरस, सरपंच प्रकाश महादू सावंत, उपसरपंच राहुल शांताराम पोटफोडे, माजी सदस्य दुर्गा तरस यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली.


मार्च महिना उन्हाच्या तीव्र झळा असल्याने वन्यजीवांना अन्न व पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. त्यात वन्यजीव नगरीवस्तीत आल्यावर त्यांच्यावर कुत्र्यांकडून हल्ले होतात. तसेच रेल्वे, द्रुतगती, महामार्ग, वनविभागात अतिक्रमण यामुळे वारंवार वन्यजीव बळींच्या घटनेत वाढ होत आहे. वनक्षेत्रात देशी वृक्षांचे रोपण संरक्षण संवर्धन काळाची गरज झाली आहे. वाढते वणवे रोखण्यासाठी वनविभागाला यश केव्हा येणार. दिवसेंदिवस वनक्षेत्र ओसाड होत आहे. याकडे महाराष्ट्र शासन वनविभागाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.




लेटेस्ट अपडेट्स