मलयाली असोसिएशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

691 views

तळेगाव दाभाडे दि.15 (प्रतिनिधी) तळेगाव दाभाडे मलयाली असोसिएशनच्या वतीने गुरुवारी (दि.15) सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 100 रुग्णांची नेत्र तपासणी करून औषधोपचार देण्यात आले. रक्तदात्यांना आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप केले.


Author : Admin
Publisher : admin
Update : 2 months ago
Date : Thu Aug 15 2024

imageरक्तदान

मावळचे आमदार सुनील शेळके, शिक्षण प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे व मुख्याध्यापिका वैशाली मिरघे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. येथील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील प्राथमिक शाळा क्र. 1 मध्ये शिबीराचे आयोजन केले.

डॉ. गौरव ओसवाल, डॉ. स्नेहल कदम, अमृत शिंदे यांनी नेत्र तपासणी काम पाहिले.

 पुरंदर ब्लड बॅंक डॉ. अजय खरात, शिल्पा रणदिवे, संचिता गोल्हे, रोहिणी भोकटे यांनी रक्तदान काम पाहिले.



मलयाली असोसिएशन अध्यक्ष नंदकुमार नायर, उपाध्यक्ष अजय नांबियार, सह सचिव गिरीश अशान, खजिनदार नितीन नांबियार व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आयोजन केले.





लेटेस्ट अपडेट्स

58 views
Image

चेन्नई एक्सप्रेस व गदग एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांना यश

वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) पश्चिम महाराष्ट्रातील रहिवाशांमध्ये लोकप्रिय असलेली प्रसिद्ध चेन्नई एक्सप्रेस आणि आणि गदग एक्सप्रेस आता पर्यटन केंद्र असलेल्या लोणावळा येथे थांबणार आहे. लोणावळा स्थानक जोडल्याने मावळ तालुक्यातील लोकांना आता या महत्त्वाच्या ट्रेनमध्ये सहज प्रवेश मिळणार आहे. या बदलांचे आदेश मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यस्थापक ब्रजेश राय यांनी जारी केले आहेत. या दोन्ही एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा मिळावा यासाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.


Read More ..