श्रीक्षेत्र देहूत रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच यांच्या तर्फे आकर्षक बैलजोडी स्पर्धेचे आयोजन

220 views

श्रीक्षेत्र देहू दि.3 (प्रतिनिधी) : भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच पुरस्कृत श्री.सचिन परशुराम काळोखे आणि चिंतामण उर्फ तात्या पंचपीड यांच्या वतीने , श्री क्षेत्र देहूगाव येथे आकर्षक बैल जोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


Author : Admin
Publisher : admin
Update : 2 weeks ago
Date : Thu Oct 03 2024

imageस्पर्धा


देहू मजरे माळवाडी विविध कार्यकारी सोसायटी यांच्या वतीने प्रत्येक सहभागी बैलजोडीस चारा ,धान्य वाटप व बैलजोडी मालक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.




मावळ तालुक्यात खिल्लार बैलाची बैलगाडा शर्यतीसाठी आणि शेतीच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात पैदास केली जाते. कृषी संस्कृती मधील महत्वाचा घटक असलेल्या बैलांना शेतकरी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे जपत , त्यांचे संगोपन करतात. मावळ तालुक्यात बैलपोळा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मोठ्या संख्येने युवक बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढून , आनंद साजरा करतात. याच , परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी रविंद्र आप्पा भेगडे युवा मंचच्या वतीने , या स्पर्धेचे छत्रपती शिव मंदिर चौक , देहूगाव येथे आयोजन करण्यात आले होते.



यामधील प्रथम पारितोषिक श्री.अमोल नामदेव काळोखे रु.५००० /- , द्वितीय पारितोषिक श्री.गोविंद बाळू हगवणे ३,०००/- आणि तृतीय पारितोषिक श्री.धोंडिबा चव्हाण २,०००/- यांच्या बैलजोडीस प्रदान करण्यात आले.



याप्रसंगी , देहू मजरे माळवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल रामभाऊ काळोखे , व्हाईस चेअरमन बाळासाहेब दामू हगवणे , माजी चेअरमन बेबीताई दत्तात्रय हगवणे , माजी चेअरमन सतीश विष्णू काळोखे , संचालक रवींद्र रामदास काळोखे , संचालक सागर दत्तात्रय हगवणे , संचालक राजेंद्र मोरे यांच्या सह देहूगाव ग्रामस्थ बंधू-भगिनी , बैलगाडा प्रेमी नागरिक , युवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते.





लेटेस्ट अपडेट्स

58 views
Image

चेन्नई एक्सप्रेस व गदग एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांना यश

वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) पश्चिम महाराष्ट्रातील रहिवाशांमध्ये लोकप्रिय असलेली प्रसिद्ध चेन्नई एक्सप्रेस आणि आणि गदग एक्सप्रेस आता पर्यटन केंद्र असलेल्या लोणावळा येथे थांबणार आहे. लोणावळा स्थानक जोडल्याने मावळ तालुक्यातील लोकांना आता या महत्त्वाच्या ट्रेनमध्ये सहज प्रवेश मिळणार आहे. या बदलांचे आदेश मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यस्थापक ब्रजेश राय यांनी जारी केले आहेत. या दोन्ही एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा मिळावा यासाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.


Read More ..