शासकीय ध्वजारोहण तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या हस्ते

354 views

वडगाव मावळ दि.13 (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासना व पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या आदेशाने शासकीय कार्यालयात दि.13 ते 15 ऑगस्ट ध्वजारोहण समारंभ कार्यक्रम जाहीर केलेनुसार मंगळवारी (दि.13) सकाळी 9:05 वा. मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


Author : Admin
Publisher : admin
Update : 2 months ago
Date : Tue Aug 13 2024

imageध्वजारोहण

राष्ट्रगीत सादर करून 15 ऑगस्ट कार्यक्रमाच्या तयारीच्या सूचना देण्यात आल्या. तहसील कार्यालय परिसरात मंडप व सजावट करण्यात आली आहे. तसेच मावळ पंचायत समिती, वडगाव नगरपंचायत, उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तसेच शासकीय कार्यलयात ध्वजारोहण करण्यात आले.



याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर, महसूल नायब तहसीलदार अविनाश पिसाळ, नायब संजय गांधी योजना नायब तहसीलदार जयश्री मांडवे, पुरवठा निरीक्षक अंकुश आटोळे, अश्विनी गायकवाड, मंडलाधिकारी माणिक साबळे, बजरंग मेकाले, मनीषा यादव, मीनल जंगम, संतोष कोचेवाड व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.





लेटेस्ट अपडेट्स

58 views
Image

चेन्नई एक्सप्रेस व गदग एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांना यश

वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) पश्चिम महाराष्ट्रातील रहिवाशांमध्ये लोकप्रिय असलेली प्रसिद्ध चेन्नई एक्सप्रेस आणि आणि गदग एक्सप्रेस आता पर्यटन केंद्र असलेल्या लोणावळा येथे थांबणार आहे. लोणावळा स्थानक जोडल्याने मावळ तालुक्यातील लोकांना आता या महत्त्वाच्या ट्रेनमध्ये सहज प्रवेश मिळणार आहे. या बदलांचे आदेश मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यस्थापक ब्रजेश राय यांनी जारी केले आहेत. या दोन्ही एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा मिळावा यासाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.


Read More ..