रेड्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; कुसगाव खुर्द येथील घटना

3336 views

वडगाव मावळ दि.25 (प्रतिनिधी) म्हैशीसह रेडा (टोणगा) चारण्यासाठी डोंगरात नेणाऱ्या शेतकऱ्यावर रेड्याने हल्ला केल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.25) सकाळी 10 वा. कुसगाव खुर्द ता.मावळ जि.पुणे हद्दीत घडली. या घटनेची माहिती कामशेत पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 month ago
Date : Sun Aug 25 2024

imageरेडा


पांडुरंग नामदेव लालगुडे वय 59 रा.कुसगाव खुर्द ता.मावळ रेड्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.


मयत पांडुरंग लालगुडे यांचा शेती व दुग्धव्यवसाय असून त्यांच्या म्हैशीचा रेडा ज्याला बाटलीने दूध पाजून मोठे केले होते. त्या रेड्याने एकदा पांडुरंग लालगुडे यांच्यावर धाव घेतली होती. त्याला विकण्याचा विचार झाला होता.

नेहमीप्रमाणे लहान मोठया 24 म्हैशी व 1 रेडा चारण्यासाठी डोंगरावर सकाळी 8 वा. गेले होते. त्या रेड्याने पांडुरंग लालगुडे यांच्यावर हल्ला करून छातीला व डोक्याला गंभीर जखमा केल्या.


त्या ठिकाणी कोणी मदतीला नसल्याने अनेक तास एकाच ठिकाणी पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती डोंगरात फिरणारी आदिवासी व्यक्तीने दिली. 

या घटनेची माहिती कामशेत पोलीस स्टेशनमध्ये दिल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला.

मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सायंकाळी 6 वा. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माजी सरपंच काळूराम लालगुडे, मारुती लालगुडे व संतोष लालगुडे यांचे ते वडील होत.





लेटेस्ट अपडेट्स

58 views
Image

चेन्नई एक्सप्रेस व गदग एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांना यश

वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) पश्चिम महाराष्ट्रातील रहिवाशांमध्ये लोकप्रिय असलेली प्रसिद्ध चेन्नई एक्सप्रेस आणि आणि गदग एक्सप्रेस आता पर्यटन केंद्र असलेल्या लोणावळा येथे थांबणार आहे. लोणावळा स्थानक जोडल्याने मावळ तालुक्यातील लोकांना आता या महत्त्वाच्या ट्रेनमध्ये सहज प्रवेश मिळणार आहे. या बदलांचे आदेश मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यस्थापक ब्रजेश राय यांनी जारी केले आहेत. या दोन्ही एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा मिळावा यासाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.


Read More ..