undefinedकिशोर भेगडे* तक्रारीला कायदेशीर उत्तर देणार

75 views

तळेगाव दाभाडे दि.16 (प्रतिनिधी) विरोधकांनी महिला पत्रकाराच्या आडून आमच्या विरोधात राजकीय षडयंत्र आखले आहे. चैत्राली राजापूरकर यांच्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही, त्यांच्या तक्रारीला मी विनम्रपणे कायदेशीर उत्तर देईल. पण यामागचे राजकीय मास्टरमाईंड तालुक्याला ठाऊक आहेत. येत्या २० तारखेला जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.बापूसाहेब भेगडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा कसलाही आरोप नाही. विरोधकांना बापूसाहेब भेगडे यांच्यावर आरोप करण्यासारखे कोणतेच शस्त्र उरले नाही.


Author : Admin
Publisher : admin
Update : 4 days ago
Date : Sat Nov 16 2024

image


पराभव दिसू लागल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, असा घनाघात माजी उपनगराध्यक्ष

 किशोर भेगडे यांनी पत्रकार 

परिषदेत केला.

 किशोर भेगडे म्हणाले, ' माझ्या पत्रकार भगिनी चैत्राली राजापूरकर यांनी माझ्या व माझ्या सहकाऱ्यांविरोधात लोणावळा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्यांना विरोधात बातमी का दिली? असे विचारले व २० तारखेनंतर बघून घेतो, अशी धमकी दिली, असा त्यांचा आमच्यावर आरोप आहे. त्यांनी केलेला आरोप हा पूर्णपणे खोटा असून आम्हाला तो मान्य नाही.

आदरणीय बापूसाहेब भेगडे यांना प्रचारात आघाडी व लोकांचा मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहून आदरणीय चैत्रालाताईं राजापूरकर यांच्या आडून विरोधक राजकीय डाव साधून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयल करत आहेत. 


खोटा आरोप करणे, गुन्ह्यात

 आमची नावे टाकणे, महिला आयोगाला तक्रार करणे असा सगळा क्रम पहाता हा आम्हाला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे. मावळच्या मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. सर्व पक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्यावर मावळच्या जनतेचे प्रेम आहे.विरोधकांचा कुटील डाव ते उधळून लावतील.

 येत्या २० तारखेला पिपाणी चिन्हासमोरील बटन दाबून

 बापूसाहेब भेगडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहनही किशोर भेगडे यांनी यावेळी केले.



----------------

सीसीटीव्ही फुटेज द्या 

किशोर भेगडे म्हणाले, ' जेव्हा चैत्राली राजापूरकर पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण व लोणावळा शहर पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ उपलब्ध करुन द्यावे. कारण विरोधी उमेदवारांचे भाऊ व त्यांचे हस्तक त्यांच्यासोबत होते याची माहिती माझ्याकडे आहे.

..............................

*महिला पत्रकाराला संरक्षण द्या*

जनतेचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांची बदनामी करून, अधिक राजकीय फायदा घेण्यासाठी विरोधी उमेदवार आणि त्यांचे बगलबच्चे चैत्राली राजापूरकर यांच्या जिवाचे काही बरे वाईट करू शकतात. त्याचा आरोप आमच्यावर करून आम्हाला बदनाम करू शकतात. त्यामुळे महिला पत्रकार चैत्राली राजापूरकर यांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे केली असल्याचे भेगडे यांनी सांगितले.





लेटेस्ट अपडेट्स