1336 views
वडगाव मावळ दि.25 (प्रतिनिधी) 204 मावळ विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2024 चार दिवसात 18 उमेदवारांनी अर्ज घेतले असून केवळ दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. केवळ आता अर्ज विक्री व स्वीकारसाठी 2 दिवस राहिले. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विक्रम देशमुख यांनी शुक्रवारी (दि.25) माहिती दिली.
1) बापूसाहेब जयवंत भेगडे, 2) किशोर छबुराव भेगडे, 3) नामदेव सावळेराम दाभाडे, 4) मुकेश मनोहर अगरवाल, 5) रवींद्र आण्णासाहेब भेगडे, 6) लक्षण श्रीपती गायकवाड, 7) उमाकांत रामेश्वर मिश्रा, 8) सुनील शंकरराव शेळके, 9) सारिका सुनील शेळके, 10 सचिन बाळासाहेब लोंढे, 11) गोपाळ यशवंतराव तंतरपाळे, 12) संतोष रंजन लोखंडे, 13) यशवंत रावजी मोहळ, 14) शेहनाज हमीद शेख , 15) हमीद खाजा शेख, 16) खंडू बाळाजी तिकोणे, 17) नागराज पुखराज गादिया, 18) श्याम रामचंद्र चव्हाण आदींनी उमेदवारी अर्ज घेतला. तर आतापर्यंत
गुरुवारी (दि.15) रोजी महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुनील शेळके व बापूसाहेब भेगडे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
मंगळवार (दि.22) ते मंगळवार (दि.29) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकार, बुधवार (दि. 30) उमेदवारी अर्ज छाननी, सोमवार (दि.4) नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागार व चिन्ह वाटप, बुधवार (दि.20) नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान व मतमोजणी शनिवार (दि.23) नोव्हेंबर मतमोजणी एकूण 402 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघात 1,96,619 पुरुष, महिला 1,87,672 व इतर 13 एकूण 3,84,304 मतदार आहेत.