826 views
वडगाव मावळ दि.22 (प्रतिनिधी) लग्न करण्याचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना सप्टेंबर 2024 दि.14 एप्रिल 2025 दरम्यान कान्हे ता.मावळ जि.पुणे हद्दीत घडला. पीडित महिलेने वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केला आहे. दि.22 एप्रिल रोजी आरोपीची तुरुंगात रवानगी केली.
एनुल नूर अहमद हक वय 38 सोएक्स फ्लोरा टाकवे बुद्रुक ता.मावळ मूळ दखीन उडानी, नगाओन आसाम असे बलात्कार प्रकरणातील आरोपीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ऐनुल नूर अहमद हक यांने फिर्यादी महिलेचे लग्न झालेलं असताना, तिच्या सोबत प्रेम संबंध निर्माण करून लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेवर सप्टेंबर 2024 दि.14 एप्रिल 2025 पर्यंत वारंवार बलात्कार केला. पीडित महिला गर्भवती झाल्यानंतर गर्भ कर नाही तर तुला ठेवणार अशी धमकी दिली. बाळाची जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने दि.17 एप्रिल 2025 रोजी गुन्हा दाखल झाला.
आरोपीला दि. 18 एप्रिल 2025 अटक केली वडगाव मावळ न्यायालयाने आरोपीला दि.22/4/2025 पर्यंत पोलीस कोठडी दिली होती कोठडी संपल्याने पुन्हा न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड करत आहेत.