300 views
वडगाव मावळ दि.22 (प्रतिनिधी) येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात स्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात हजारो वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील रविवारी (दि.20) 18 जोडपी विवाहबद्ध झाली.
वडगाव मावळ दि.22 (प्रतिनिधी) येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात स्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात हजारो वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या सोहळ्याची सुरुवात श्रींच्या अभिषेकाने झाली. साखरपुडा प्रसंगी कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका सुनील शेळके, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, जिल्हा नियोजनचे माजी सदस्य अविनाश बवरे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर वधू वरांचा हळदी समारंभ, वऱ्हाडी मंडळींचे भोजन तसेच नवरदेवांची भव्य मिरवणूक पार पडली. यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पदाधिकारी व वऱ्हाडी मंडळींसह ट्रेडिंग ग्रुपच्या 15 सदस्यांनी सहभाग घेतला.
सायंकाळी हजारो संख्येने उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पडला. यावेळी हभप मंगल महाराज जगताप, हभप हांडे महाराज यांनी वधू वारांना शुभाशीर्वाद दिले तर खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, पोटोबा देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे आदी उपस्थित होते.याप्रसंगी सोहळ्यातील अन्नदान केल्याबद्दल आमदार सुनील शेळके यांचा श्री हनुमानाची मूर्ती देऊन विशेष सन्मान करण्यात आला. .
प्रास्ताविक सोहळा समिती अध्यक्ष अजय धडवले यांनी केले, सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव गणेश विनोदे, अतुल राऊत यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले तर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांनी आभार मानले. सोहळा समितीचे अध्यक्ष अजय धडवले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष प्रवीण कुडे, कार्यक्रमप्रमुख संजय दंडेल, उपाध्यक्ष खंडूजी काकडे, सचिव विनायक लवंगारे, खजिनदार अक्षय बेल्हेकर, भूषण ढोरे, प्रतिष्ठानचे पदाधिकारी अर्जुन ढोरे, राजेंद्र वहिले, विलास दंडेल, अनिल कोद्रे, रोहिदास गराडे, अरुण वाघमारे, काशिनाथ भालेराव, विवेक गुरव, अविनाश कुडे, सुनील शिंदे, सदाशिव गाडे, अविनाश चव्हाण, सोमनाथ धोंगडे, शंकर ढोरे, महेश तुमकर, नंदकुमार ढोरे, प्रवीण ढोरे, बाळासाहेब तुमकर, संतोष निघोजकर, अनिकेत भगत, गणेश झरेकर, गणेश ढोरे, सुधीर ढोरे, सुहास विनोदे, सतीश गाडे, दर्शन वाळुंज, कार्तिक यादव, केदार बवरे आदींसह महीला पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले.
सोहळ्यातील वैशिष्टे....
*रक्तदान शिबिर
*वऱ्हाडी मंडळींची बैठक व भोजन व्यवस्था
*नवरदेवाची भव्य मिरवणूक
*वधू वरांना संसारपयोगी भांडी, मनगटी घड्याळ, आकर्षक भेट
*वधूंना चांदीचे अलंकार
*ट्रेडिंग ग्रुपचे रक्तदान व कन्यादान