बिअर शॉपीवर कारवाई न करण्यासाठी 5000 लाच घेतल्या प्रकरणी पोलीस हवालदाराला अटक

918 views

तळेगाव दाभाडे दि.14 (प्रतिनिधी) बिअर शॉपी व्यवस्थित चालु ठेवण्यासाठी, कोणताही त्रास न होण्यासाठी व खोटे गुन्हे दाखल न करण्यासाठी 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदाराला सोमवारी (दि.14) कृपा बिअर शॉपीसमोर, मंत्रा सिटी रोड, तळेगाव दाभाडे, ता. मावळ अटक करण्यात आली.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 week ago
Date : Mon Oct 14 2024

imageलाच



पोलीस हवालदार सतीश अरुण जाधव (वय 42, तळेगाव दाभाडे ता. मावळ जि.पुणे) लाच प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.




लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या दोन बिअर शॉपी आहेत. आरोपी पोलीस हवालदार सतीश जाधव यांनी तक्रारदार यांचेकडे सदर बिअर शॉपी व्यवस्थित चालु ठेवण्यासाठी, कोणताही त्रास न होण्यासाठी व खोटे गुन्हे दाखल न करण्यासाठी प्रत्येक बिअर शॉपी चे 6,000 प्रमाणे दोन बिअर शॉपीचे एकुण 12,000 रुपयांच्या लाचेची मागणी स्वतःसाठी व पोलीस निरीक्षक यांचेसाठी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे दिली होती.



सदर तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, आरोपी सतीश जाधव यांनी तक्रारदार यांचेकडे वरील कामासाठी तडजोडीअंती 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी करुन 5,000 रुपयांची लाच स्विकारल्याने आरोपी सतीश जाधव याना ताब्यात घेऊन अटक करण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७, ७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.



सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रेम वाघमोरे करत आहेत.



लोकसेवक शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.



१) अॅन्टी करप्शन ब्यूरो, पुणे दुरुध्वनी क्रमांक ०२० २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३


२) व्हॉट्स अॅप क्रमांका मुंबई ९९३०९९७७००


३) ई मेलआयडी पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in


४) ५) ऑनलाईन अॅप तक्रार www.acbmaharashtra.net.in




लेटेस्ट अपडेट्स

58 views
Image

चेन्नई एक्सप्रेस व गदग एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांना यश

वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) पश्चिम महाराष्ट्रातील रहिवाशांमध्ये लोकप्रिय असलेली प्रसिद्ध चेन्नई एक्सप्रेस आणि आणि गदग एक्सप्रेस आता पर्यटन केंद्र असलेल्या लोणावळा येथे थांबणार आहे. लोणावळा स्थानक जोडल्याने मावळ तालुक्यातील लोकांना आता या महत्त्वाच्या ट्रेनमध्ये सहज प्रवेश मिळणार आहे. या बदलांचे आदेश मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यस्थापक ब्रजेश राय यांनी जारी केले आहेत. या दोन्ही एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा मिळावा यासाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.


Read More ..