भजन करून घरी निघालेल्या दुचाकीचा अपघात;पती पत्नीचा मृत्यू

8399 views

वडगाव मावळ दि.6 (प्रतिनिधी) भजन करून दुचाकीवरून घरी जात असताना अज्ञात कारने दुचाकीला जोरात धडक दिली त्यात पती व पत्नीचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.5) रात्री 10:30 वा. कात्रज डेअरी समोर पुणे मुंबई महामार्गावर नायगाव ता. मावळ हद्दीत घडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Author : Admin
Publisher : admin
Update : 2 weeks ago
Date : Sun Oct 06 2024

imageअपघात

गणेश दत्तात्रय चोपडे व अर्चना गणेश चोपडे रा.नायगाव ता.मावळ जि.पुणे अपघातात मृत्यू झालेल्या पती व पत्नीचे नाव आहे.


कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश चोपडे व अर्चना चोपडे हे पती पत्नी भजन करून एम एच 14 GB 7074 या दुचाकीवरून घरी जात असताना काळ्या रंगाचा अज्ञात थार कारने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात गणेश चोपडे व अर्चना चोपडे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यांच्या मागे दोन मुलं आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका अध्यक्ष नवनाथ चोपडे यांचा चुलत भाऊ व भावजयी होत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


मृतदेहाचे शवविच्छेदन तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत आहेत.

या अपघाताचा तपास पोलीस उप निरीक्षक अब्दुल शेख करत आहेत.



" महामार्गाच्या लगत सेवा रस्ता नसल्याने दिवसेंदिवस

 गावातील नागरिकांचे अपघातात बळी जात आहेत. अनेक ठिकाणी उड्डाणपूल करण्याची गरज असल्याची मागणी नागरिक करत आहेत.




लेटेस्ट अपडेट्स

58 views
Image

चेन्नई एक्सप्रेस व गदग एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांना यश

वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) पश्चिम महाराष्ट्रातील रहिवाशांमध्ये लोकप्रिय असलेली प्रसिद्ध चेन्नई एक्सप्रेस आणि आणि गदग एक्सप्रेस आता पर्यटन केंद्र असलेल्या लोणावळा येथे थांबणार आहे. लोणावळा स्थानक जोडल्याने मावळ तालुक्यातील लोकांना आता या महत्त्वाच्या ट्रेनमध्ये सहज प्रवेश मिळणार आहे. या बदलांचे आदेश मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यस्थापक ब्रजेश राय यांनी जारी केले आहेत. या दोन्ही एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा मिळावा यासाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.


Read More ..