धर्मदायुक्तांची नोंदणी नसणाऱ्या मंडळाची खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल

369 views

देहूरोड दि.13 (प्रतिनिधी रामकुमार आगरवाल) " तुम्हाला येथे धंदा करणे मुश्किल करून टाकीन तसेच तुम्हाला कायमचे संपवून टाकीन असे म्हणून जीवे ठार मारण्याची धमकी देवून मंडळ (धर्मादायुक्त ) रजिस्टर नसताना अथवा कोणतेही अधिकारपत्र नसताना वर्गणीच्या नावाखाली खंडणी जमा करणाऱ्याला देहूरोड पोलिसांनी रविवारी ( दि.१३ ) अटक केली आहे. तपासकामी त्याची बाजारातून त्याची धिंड काढण्यात आली.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 week ago
Date : Sun Apr 13 2025

imageखंडणीखोराची धिंड


देहूरोड पोलिसांनी एकाला केली अटक

खंडणीखोराची बाजारातून काढली धिंड


खंडणीखोरावर होते चार गुन्हे दाखल



  राजू उर्फ राजा मासलामनी पिल्ले (.वय ३५ ,राह. मरीमाता मंदिराजवळ,गांधीनगर, देहूरोड) असे खंडणी मागणाऱ्याचे नाव आहे.

प्रशांत अमृतलाल कटारिया (वय ४७,राह. गिनी बिल्डिंग, राहुल प्रिंटर्स जवळ, मेन बाजार ,देहूरोड ) यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदवली आहे.

   पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार देहूरोड येथील आंबेडकर मित्र मंडळ हे धर्मादाय आयुक्ताची अधिकृत नोंदणी कृत नसताना अथवा कोणतेही अधिकार पत्र नसताना बाजार पेठेतील व्यापाऱ्यांना धमकावून वर्गणी जमा करताना मेन बाजारपेठेतील कुंदन ड्रेस व कुंदन सारीज सेंटर या दोन्ही दुकानाच्या नावाने पिल्ले याने प्रत्येकी ५०१ रुपयाची जबरदस्तीने पावती बनवून शुक्रवारी ( दि.११ ) दुकानाच्या कर्मचाऱ्यांना देऊन पैसे घेण्यासाठी उद्या येतो असे म्हणून निघून गेला. जैन मंदिर जवळील कुंदन सारीज सेंटर या दुकानांमध्ये पिल्ले शनिवारी (दि.१२ )दुपारी तीनच्या सुमारास येऊन दोन्ही दुकानांचे एक हजार रुपये द्या अशी मागणी केली असता दुकानात असणारे फिर्यादीचे चुलते अरविंद कुंदनलालजी कटारिया यांनी दोन्ही दुकाने एकच असल्याने पाचशे रुपये दिले असता पिल्ले याने " तुम्हाला येथे धंदा करणे मुश्किल करून टाकीन तसेच तुम्हाला कायमचे संपवून टाकीन असे म्हणून जीवे ठार मारण्याची धमकी देवून खंडणी मागत पैसे घेतले. 

  आंबेडकर मित्र मंडळाकडे धर्मदाय आयुक्तांचे अधिकृत नोंदणी अथवा कोणीही अधिकार पत्र नसताना बाजारातील सुनील सोनीगरा यांच्याकडून १ हजार, कांचन ज्वेलर्स यांच्याकडून अकराशे, हनुमान स्टोअर्स यांच्याकडून २०१, बरलोटा ज्वेलर्स यांच्याकडून ५०१, यासह इतर व्यापाऱ्यां कडेही वर्गणीच्या नावाखाली खंडणी मागितली आहे .   विविध महापुरुषांच्या जयंती अथवा वेगवेगळे, सण, उत्सव साजरे करण्याच्या अनुषंगाने वर्गणीच्या नावाखाली व्यापाऱ्यांना दमदाटी करून वर्गणी गोळा करत असल्याचे बाजारपेठेत चर्चा होत आहे. राजा पिल्ले याच्यावर हिंजवडी व देहूरोड पोलिस ठाण्यामध्ये चार गुन्हे दाखल आहेत.

  दरम्यान झालेल्या वादावाद आणि धमक्यांमुळे अरविंद कटारिया यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घडलेल्या घटनांमुळे बाजारा पेठेतील व्यापारी संतप्त झाले होते. रविवारी सकाळी अरविंद कटारिया यांचा अंत्यविधी झाल्यानंतर सर्व व्यापारी आणि राजकीय पदाधिकारी यांनी पोलीस ठाण्यात जमाव जमले आणि पोलीस अधिकारी यांना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. धर्मदाय आयुक्तची नोंद नसणाऱ्या अथवा कोणतेही अधिकार पत्र नसताना किंवा अनधिकृत विनापरवाना वर्गणी गोळा करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी ही केली. घडलेल्या घटने प्रकरणी तक्रार दाखल करीत देहूरोड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केले आहे . राजा पिल्ले याला अटक केली असुन त्याची देहूरोड बाजारपेठे, ज्वेलर्स मार्केट भाजी मंडई दरम्यान धिडं काढण्यात आली.

याप्रकरणी अधिक तपास देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लखनकुमार वाव्हळे करीत आहे .



चौकट

  पोलिसांना फक्त माहिती देण्याचे व्यापाऱ्यांना आवाहन

   पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या व्यापारांना कोणीही वर्गणीच्या नावाखाली खंडणी मागत असल्यास अथवा इतर कारणास्तव दमबाजी अथवा कोणतीही घटना आजूबाजूला घडल्यास तसेच धर्मादाय आयुक्त यांची नोंदणी नसलेल्या अथवा कोणतेही अधिकार पत्र नसताना वर्गणी जमा करणाऱ्याची पोलिसांना फक्त माहिती कळवावे. कोणत्याही व्यक्तीचे अथवा व्यापारांचे नाव जाहीर न करता योग्य ती कारवाई करण्यात येईल असे यावेळी आवाहन करण्यात आले आहे.




लेटेस्ट अपडेट्स