1052 views
वडगाव मावळ दि.11 (प्रतिनिधी) पुन्हा एकदा रेल्वे स्टेशनच्या सिग्नलच्या बाहेर अज्ञात रेल्वेच्या धडकेने अज्ञात 30 ते 35 वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू दि.11 दुपारी 1 वा. वडगाव मावळ रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली. घटनेचा साडे पाच तास होवूनही मृतदेहाचा पंचनामा नाही स्थानिक व जी आर पी एफ पोलिसांचा वाद
काही महिन्यांपूर्वी जांभूळ परिसरात अशीच घटना घडली होती. त्यावेळी असाच पेच निर्माण झाला होता.
सिग्नलच्या बाहेरच्या परिसरात रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्यावर ग्रामीण हद्दीत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक हद्दीतील पोलीस स्टेशन व जी आर पी जवान यांची जबाबदारी असते.
अद्यापही या घटनेला 5 तास होवूनही मृतदेहाचा पंचनामा केला नाही. या मृतदेहाची विटंबना होत आहे. या मृतदेहाची ओळख तसेच पंचनामा केव्हा होणार. मृतदेहाच्या बाजुला भटकी कुत्री व कावळे लचके तोडण्यासाठी घोंगावत आहेत.
आता तरी या मृतदेहाचा पंचनामा होणार का ? याठिकाणी रेल्वे पोलीस बल या मृतदेहाच्या दुपारी 1:30 वा. पोहचून स्थानिक पोलीस व जी आर पी एफ यांना संपर्क साधत असून कोणी प्रतिसाद देत नाहीत.