1161 views
वडगाव मावळ दि.20 (प्रतिनिधी) दुचाकीला भरधाव कार ने जोरात धडक देऊन अपघात केला यात कार अनेकदा पलटी झाली. दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (दि.20) सायंकाळी 4 वा. फळणे फाटा टाकवे बुद्रुक ता.मावळ हद्दीत झाला. हा अपघात खूपच भीषण होता. कार चालक फरार झाला आहे.
रोहिदास शंकर करवंदे (वय 40 रा. सावळा ता.मावळ ) अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीवरील व्यक्तीचे नाव आहे.
गणेश लक्षण आढारी (वय 36 रा. सावळा ता.मावळ ) गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश आढारी व रोहिदास करवंदे हे MH 14 L Q 0253 दुचाकीवरून वडगाव ते सावळा निघाले असता, M H 14 K F 6701 क्रमांकाच्या भरधाव कारने दुचाकी जोरात धडक देऊन अपघात केला. यात दुचाकीवरील रोहिदास करवंदे यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला तर गणेश आढारी गंभीर जखमी झाले.
गंभीर जखमी गणेश आढारी यांच्यावर कामशेत येथील महावीर हॉस्पीटल मध्ये उपचार सुरू आहेत.
दुचाकी व कार चे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस हवालदार सचिन कदम, पोलीस अमलदार चेतन दळवी यांनी धाव घेऊन अपघात स्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रवाना केला.
पुढील पोलीस हवालदार सचिन कदम करत आहेत.