837 views
तळेगाव दाभाडे दि.22 (प्रतिनिधी) सोमाटणे फाटा येथील एका हॉटेल मध्ये महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी हॉटेलवर कारवाई करत दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. ही कारवाई शनिवारी (19 एप्रिल) रात्री करण्यात आली.

सोमाटणे फाटा येथील कॅसोनोवा या हॉटेल मध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा मारला. या कारवाई मध्ये एक महिला दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली. तसेच दोन पीडित महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली.