1002 views
वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) यात्रेत जेवणावरून झालेल्या वादातून सख्ख्या भावासह दोघांनी एकाला लोखंडी रॉड व दगडाने डोक्यात पायावर पाठीवर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी (दि.13) सकाळी 11 वा. ढाकभैरी जांभवली ता.मावळ जि.पुणे हद्दीत
आरोपींना अद्यापही अटक नाही आरोपी मोकाट आहेत.
लक्ष्मण तुकाराम टोकरे वय 55 रा.पाले नामा ता.मावळ असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
बंडु तुकाराम टोकरे, किसन विठठल सोरकादे व शरद किसन सोरकादे सर्व रा. पाले नामा ता.मावळ गंभीर मारहाण गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी जखमी लक्षण टोकरे हे रविवारी (दि.13) सकाळी 11 वा. पाले गावातील लोकांसह पिक-अप करुन ढाकभैरी जांभवली येथे यात्रे निमित्त जेवण्याचा कार्यक्रम करण्यासाठी ढाकभैरीच्या पायथ्याला आले, मी व गावातील लोकांनी जेवन तयार करुन देवाला नैवदय दाखवुन जेवण्यसाठी बसलो, त्यावेळी फिर्यादीने लोकांना जेवण वाढा उशीर झाला आहे असे म्हणाले असता,
माझा मोठा भाऊ आरोपी बंडू टोकरे मला म्हणाला तु काय आमदार आहेस का त्यावेळी मी पण त्यास तु काय आमदार आहेस का असे म्हणालेचा राग मनात धरुन मोठा भाऊ आरोपी बंडु तुकाराम टोकरे, किसन विठठल सोरकादे व शरद किसन सोरकादे यांनी माझ्या अंगावर धावून येवून मला हाताने व लाथा बुक्याने मारहाण करु लागले त्यावेळी मी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी बंडु टोकरे हा हाताने मारहान करत होता व किसन सोरकादे याने शेजारी पडलेला दगड माझे उजव्या पायाच्या खुब्यावर मारला व शरद सोरकादे याने तेथे शेजारी पडलेला लोखंडी रॉडने माझ्या डोक्यात, पायावर व पाठीवर मारहाण केली. गावातील लोक धावून आल्याने आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. गंभीर जखमी लक्ष्मण टोकरे हे बेशुद्धावस्थेत पडले होते त्यांच्यावर कामशेत येथील महावीर हॉस्पीटल मध्ये उपचार सुरू आहेत.
पुढील तपास पोलीस उप निरीक्षक दत्ता शेडगे करत आहेत.