अटल आरोग्य अभियानांतर्गत मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २७२ शाळांना प्रथमोपचार संच वाटप

407 views

वडगाव मावळ दि.23 (प्रतिनिधी) अटल आरोग्य अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, वडगाव शहर यांचे वतीने मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व २७२ शाळांना प्रथमोपचार संच वाटप उपक्रम प्रातिनिधिक स्वरूपात पंचायत समिती, मावळ येथे संपन्न झाला.


Author : Admin
Publisher : admin
Update : 2 months ago
Date : Tue Jul 23 2024

imageउपक्रम


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वडगांव शहर भारतीय जनता पार्टीचा स्तुत्य उपक्रम



मावळ तालुका भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर , पुणे जिल्हा नियोजन समिती चे मा.सदस्य अविनाश बवरे , मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर , वडगांव शहर भाजपा अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर , गटशिक्षण अधिकारी सुदाम वाळुंज, ज्येष्ठ नेते शत्रुघ्न धनवे, मा.अध्यक्ष किरण भिलारे , अनंता कुडे, मा.सरपंच नितीन कुडे , मा.नगरसेवक ॲड.विजयराव जाधव , प्रसाद पिंगळे , रवींद्र काकडे , भूषण मुथा , विकी म्हाळसकर, विषय साधन व्यक्ती सविता पाटील , शितल शिशुपाल, विशेष शिक्षक शकीला शेख, साधना काळे, सुमित्रा कचरे व डाटा एन्ट्री ऑपरेटर मनीषा कोकाटे उपस्थित होते.



मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये सुमारे २७२ शाळा असून यांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेत काही वैद्यकीय समस्या उद्भवल्यास अथवा मैदानावर खेळत असताना कदाचित काही लहान मोठ्या अपघातांनंतर होणाऱ्या लहान मोठ्या जखमांवर तातडीचा उपाय म्हणून हे प्रथामोपचार संच अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.


अंगदुखी , गुडघेदुखी , पाठदुखी , मुकामार यावरील मलम , कापणे ,भाजणे आणि खरचटणे या वरील मलम , जखम निर्जंतुकीकरणासाठी अँटीसेप्टिक द्रव्य बाटली , थकवा अथवा शरीरातील पाणी कमी झाल्यास उपयुक्त असणारे ओ आर एस , बँडेड पट्ट्या, कापूस , व्हॅसलीन डबी, बँडेज , चिकट पट्टी, इ वस्तू तसेच या वस्तूंचा वापर कसा करावा याबाबत आणि सार्वत्रिक लसीकरणाचा तक्ता असलेले माहितीपत्रक एका पारदर्शक डब्यामध्ये असलेला व्यवस्थित संच असे या प्रथमोपचार संचाचे स्वरूप आहे.


पंचायत समिती शिक्षण विभागाद्वारे अधिकारी, केंद्रप्रमुख आणि शिक्षक यांच्या माध्यमांतून प्रत्येक शाळांना हे प्रथमोपचार संच वाटप केले जाणार आहे.





लेटेस्ट अपडेट्स

30 views
Image

चेन्नई एक्सप्रेस व गदग एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांना यश

वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) पश्चिम महाराष्ट्रातील रहिवाशांमध्ये लोकप्रिय असलेली प्रसिद्ध चेन्नई एक्सप्रेस आणि आणि गदग एक्सप्रेस आता पर्यटन केंद्र असलेल्या लोणावळा येथे थांबणार आहे. लोणावळा स्थानक जोडल्याने मावळ तालुक्यातील लोकांना आता या महत्त्वाच्या ट्रेनमध्ये सहज प्रवेश मिळणार आहे. या बदलांचे आदेश मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यस्थापक ब्रजेश राय यांनी जारी केले आहेत. या दोन्ही एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा मिळावा यासाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.


Read More ..