206 views
वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. महाविद्यालय जीवनात नेतृत्व निर्माण होण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा मार्गदर्शक ठरतात. वक्तृत्व स्पर्धेतून अनेक विद्यार्थ्यांनी करिअर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तित्व अष्टपैलू असून विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा अभ्यास करणे काळाची गरज आहे.
येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ कला वाणिज्य बीबीए महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनानिमित्त रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात डॉ कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक वैष्णवी आंद्रे, द्वितीय क्रमांक चैताली वाघमारे व अक्षदा सुतार तृतीय क्रमांक प्रीती शेवाळे यांनी मिळविला. या स्पर्धेत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी प्राचार्य अशोक गायकवाड, प्रा.महादेव वाघमारे, डॉ.शीतल दुर्गाडे, प्रा.रोहिणी चंदनशिवे, प्रा.योगेश जाधव, डॉ जया धावारे, प्रा. मोहिनी ठाकर, प्रा. प्रियांका व्ही पाटील, प्रा. प्रणिता सूर्यवंशी, प्रियांका डी पाटील, गंथपाल सुप्रिया पाटोळे व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण प्रा.महादेव वाघमारे व डॉ.शीतल दुर्गाडे यांनी केले.
कर्ताक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रियांका व्ही पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.मोहिनी ठाकर यांनी केले. आभार प्रा. प्रणिता सूर्यवंशी यांनी मानले.