जागतिक मराठी राजभाषा दिन साजरा

248 views

वडगाव मावळ दि.27 (प्रतिनिधी) येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य बीबीए महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने गुरुवारी (दि.27) सकाळी 9 30 वा. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त जागतिक मराठी राजभाषा दिन सादर करण्यात आला.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 month ago
Date : Thu Feb 27 2025

image

यावेळी प्राचार्य अशोक गायकवाड यांचा "कवितांच्या गावी जावे" कार्यक्रमातून मराठी भाषा इतिहास, मराठी भाषेतील साहित्यिक व कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

चैताली वाघमारे, शामल शिंदे, अक्षदा सुतार, साक्षी पारखी, आर्या सांगळे, तन्वी ठोसर, सानिका कोल्हे, आदी विद्यार्थ्यांनी सुमधुर गाणी, कविता, गवळण व अभंग गायले.


याप्रसंगी प्रा.महादेव वाघमारे, डॉ. शीतल दुर्गाडे, डॉ. जया धावारे, प्रा. अशोक कोकळे व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, सचिव अशोक बाफना, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे व संचालकांनी मराठी राजभाषा दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.रोहिणी चंदनशिवे यांनी केले. डॉ.शीतल दुर्गाडे यांनी आभार मानले.





लेटेस्ट अपडेट्स