1028 views
वडगाव मावळ दि.1 (प्रतिनिधी) साते मावळ येथील नामवंत युवा वेटलिफ्टर सार्थक संदीप आगळमे (वय 19) याचे गुरुवारी (दि. 27) रात्री 10:30 वा. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्याच्यामागे आई, वडिल, भाऊ, चुलते, चुलत भाऊ व बहीण असा मोठा परिवार आहे. सार्थक हा वडगाव मावळ येथील सह्याद्री जीमचा खेळाडू होता. त्याठिकाणी तो नियमित व्यायाम करीत असे. साते ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप आगळमे यांचा मुलगा तर माजी उप सरपंच प्रकाश आगळमे यांचा तो पुतण्या होत.
महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर विविध वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये त्याने विजय संपादन करून मोठा नावलौकिक मिळविला होता. सार्थक आगळमे भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) क्रीडा प्रकारात साते गावचे नाव पुणे जिल्ह्यात गाजविणारा युवा खेळाडू, पुणे जिल्हा सुवर्ण पदक विजेता म्हणून ओळखला जात होता. सार्थकच्या आकस्मिक निधनामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.