442 views
तळेगाव दाभाडे दि.3 (प्रतिनिधी) मावळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी प्रचारांमध्ये चांगलीच आघाडी घेतली असून, आमदार म्हणून निवडून देण्याचा विश्वास ठिकठिकाणी मतदारांकडून देण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या दिवाळीमध्ये नागरिकांना प्रत्यक्ष भेटीत तरुण कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व महिलांचा भेगडे यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने बापूसाहेब भेगडे यांचे पारडे दिवसेंदिवस अधिक जड होत चालले आहे.
दिवाळी पाडव्याच्या दिवशी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी तळेगावमधील राव कॉलनी, हरणेश्वर कॉलनी, गंगा रेसिडेन्सी, पैसा फंड कॉलनी, मावळ लँड सोसायटी, स्वराज नगरी, इंद्रायणी कॉलनी, जोशीवाडी, तसेच आदी परिसरात सदिच्छा भेटी देत अनेक ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. नागरिकांच्या गाठीभेटी घेत असताना महिला भगिनींनी औक्षण करत भेगडे यांना ‘विजयाचा तिलक’ लावला. युवा कार्यकर्त्यांनी खंबीरपणे पाठीशी उभे राहत बापूसाहेब भेगडे यांना विजयाचा विश्वास दिला. परिसरातील विविध मंदिरांमध्ये देवतांचे दर्शन घेत भेगडे यांनी आशीर्वाद देखील घेतले. भेगडे जागोजागी फटाक्यांच्या अतिशबाजीत जल्लोषात स्वागत केले.
मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजप- काँग्रेस-शिवसेना (उबाठा)-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष - मनसेचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. मतदारसंघातील तळेगाव परिसरात गाठीभेटी आणि बैठकांचा धडाका लावला आहे. संपूर्ण तळेगावात त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्तेही दिवसरात्र भेगडे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधताना २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानादिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडून बापूसाहेब भेगडे यांनाच मतदान करावे, असे आवाहन करीत आहेत.
दरम्यान, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी 'होम टू होम' गाठीभेटीवर भर दिला. मतदारांनीही समाजात दुही माजवणाऱ्यांना आम्ही मत देणार नाही, आमचं मत बापूसाहेब भेगडे यांनाच असा विश्वास दिला.
बापूसाहेब भेगडे यांनी आज माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, रवींद्र भेगडे, गणेश काकडे यांच्या समवेत तळेगावमधील अशोक विक्रम सोसायटी, कैकाडी आळी, भोई आळी, खंडोबा माळ आदी परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी महिलांनी औक्षण करीत नक्की विजयी व्हाल, असे आश्वासन दिले. रविवार आठवडे बाजारातील विक्रेत्यांचीशी बापूसाहेब भेगडे यांनी संवाद साधला आणि येत्या २० नोव्हेंबर रोजी आपल्यालाच मत देण्याचे आवाहन केले. विक्रेत्यांनीही आपण ठामपणे तुमच्या पाठीशी उभे राहून निवडून आणू, असा शब्द दिला.
"प्रतिक्रिया :
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराला सुरवात झाली आहे. सर्वसामान्य जनतेपर्यंत सातत्याने पोहचण्याचा प्रयत्न करत आहोत. नागरिकांचाही आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनता सोबत असल्याने नक्कीच विक्रमी मताधिक्य मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. त्याचबरोबर मतदार संघातील प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा स्वतःला उमेदवार समजूनच काम करत आहेत.
-बापूसाहेब भेगडे, अपक्ष उमेदवार, मावळ विधानसभा मतदारसंघ"