47 views
वडगाव मावळ दि.20 (प्रतिनिधी) चरत असलेल्या म्हैशीच्या पाठीवर विद्युत तार पडल्याने म्हैशीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी 12:30 वा करंजगाव ता.मावळ जि पुणे हद्दीत घडली.
हिरामण भाऊ पोटफोडे यांची म्हैस शुक्रवारी चरण्यासाठी सोडली असता, अचानक म्हैशीच्या पाठीवर विद्युत तार तुटून पडली यात म्हैशीला शॉक बसल्याने जागीच मृत्यू झाला. यात शेतकऱ्याचे लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. करंजगाव हद्दीत ही तिसरी घटना आहे. सुदैवाने शेतकरी वाचला.
विद्युत विभागाचा गलथान कारभार उघडकीस येत आहे. मावळ तालुक्यात विजेचा लपंडाव नित्याचा झाला असून धोकादायक विद्युत खांब व विद्युत तारा याकडे दुर्लक्ष होत असल्याने जीवित हानीच्या घटनेत वाढ होत आहे. विद्युत तार पडून मृत्यू झालेल्या म्हैशीची नुकसान भरपाई लवकर मिळण्याची मागणी शेतकरी कुटुंबाने केली आहे.