233 views
तळेगाव दाभाडे दि.5 (प्रतिनिधी) ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर प्रांगणात संत तुकाराम सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे व PMRDA सदस्य नगरसेवक संतोष छबुराव भेगडे आयोजित बैलपोळा महोत्सव-2024 बैल सजावट स्पर्धा बुधवारी (दि.2) सायंकाळी 5 ते रात्री १० वा. मोठ्या उत्साहात संपन्न झाली. बैलगाडा मालक, शेतकरी प्राणी मित्रांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकऱ्यांना वर्षभर शेतात काम करायला मदत करणारा बैल, बैलाच्या अपार मेहनतीवर शेतकरी धान्य पिकवतो. बैलाच्या वर्षभराच्या कष्टाचे ऋण व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा, हा सण पारंपरिक पध्दतीने दरवर्षी साजरा होतो. बैलांना या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालून, बैलांची विधिवत, पारंपरिक पद्धतीने पूजा करुन गावातून मिरवणुक काढली जाते.
अशाप्रकारे बळीराजा दरवर्षी बैलपोळा हा सण मोठ्या जल्लोषात व आनंदात साजरा करतो.
हया वर्षी काही वेगळ्या पद्धतीने हा बैलपोळा सण साजरा करण्याच्या हेतुने कार्यक्षम नगरसेवक, PMRDA सदस्य संतोष भेगडे व पुणे जिल्ह्यातील नावाजलेले हिंदकेसरी घड्याळ मास्तर पै. दिनकर ऊर्फ बाळा भेगडे यांच्या संकल्पनेतूनबैल सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत तळेगाव दाभाडे शहर पंचक्रोशीतील विविध गावातील नामांकित ७० पेक्षा जास्त बैलगाडा मालकांनी, बैलगाडा संघटनांनी आपल्या आवडत्या आणि प्रसिद्ध बैलांना आकर्षक अशी सजावट करून सहभागी केले होते. या कार्यक्रमासाठी तळेगाव शहरातील तसेच पंचक्रोशितल विविध क्षेत्रातील नावाजलेले बैलगाडा मालक, बैलगाडा शौकिन त्यांचे सर्व सहकारी सहभागी झाले होते.
बैलगाडा संघटना विमा अध्यक्ष आण्णासाहेब भेगडे, बैलगाडा मालक सोपानतात्या भेगडे, सामाजिक कार्यकर्ते बाळतात्या भेगडे, संजय मल्हारी दाभाडे, ज्ञानेश्वर भांगरे आदींनी पंच म्हणून काम पाहिले सर्व बक्षिसे विभागून देण्यात आली.
प्रथम क्रमांक
चेतन केशव भेगडे ट्रॉफी रोख रक्कम,
संभाजी आप्पा भेगडे रोख रक्कम,
दाभाडे पाटिल बैलगाडा संघटना - रोख रक्कम.
द्वितीय क्रमांक -
वैभव ज्ञानेश्वर भेगडे ट्रॉफी व रोख रक्कम,
संजय मल्हारी दाभाडे रोख रक्कम,
आकाश अशोक दाभाडे - रोख रक्कम
तृतीय क्रमांक -
पै दिनकर बाळा भेगडे रोख रक्कम,
अनिल भानुसघरे ट्रॉफी रोख रक्कम.
चतुर्थ क्रमांक
संजय मल्हारी दाभाडे - ट्रॉफी व रोख रक्कम,
वेदोले दत्तात्रय भेगडे रोख रक्कम.
पंचम क्रमांक
चेतन रामदास भेगडे ट्रॉफी व रोख रक्कम,
संभाजी आप्पा भेगडे रोख रक्कम.
या स्पर्धेचे मुख्य आयोजन नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्टस फाउंडेशनचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे हिंद केसरी घड्याळ मास्तर पै. दिनकर ऊर्फ बाळाभाऊ भेगडे व त्यांचे सर्व सहकारी मित्र परिवार यांनी केले.
या कार्यक्रमात प्रामुख्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व प्रगतिशिल शेतकरी यांनी आपली उपास्थिती दर्शवली.
या कार्यक्रमाचे सर्व नियोजन अतिशय उत्कृष्ट होण्यासाठी फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
पै. दिनकर बाळा भेगडे, वैभव भेगडे, सचिन भेगडे, सोमनाथ भेगडे, अमित भसे, जीवन भेगडे, समिर काकडे, विशाल भेगडे, बाळू वाजे, रुपेश गरुड, धनराज माने, चंदन भेगडे, आशुतोष भेगडे, अनिकेत वाघोले, सिध्देश भेगडे त्याचप्रमाणि डोळसनाथ तालिम मंडळाचे सर्व सहकारी,उपस्थित होते. सुत्रसंचालन
जीवन भेगडे व अमित यांनी केले. मार्गदर्शनपर मनोगत बैलगाडा संघटना विमा अध्यक्ष आण्णासाहेब भेगडे यांनी केले.
यावेळी त्यांनी सर्व सहभागी बैलजोडी मालकांचे आभार मानले.