शांताराम परदेशी यांचा 75वा अमृत महोत्सवी सोहळा

112 views

तळेगाव दाभाडे दि.27 (प्रतिनिधी) शहरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष शांताराम परदेशी याचे वडील शांताराम शंकरराव परदेशी यांचा 75 वा अमृत महोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 month ago
Date : Thu Feb 27 2025

image


इतर खर्चाला फाटा देऊन तीन संस्थांना भेटवस्तू देण्यात आल्या त्यामध्ये प्रामुख्याने स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुल,वराळे येथील मतिमंद मुलांची शाळा यांना प्रत्येकी धान्यवाटप करण्यात आले तसेच विश्रांती वृद्धाश्रम यांना टीव्ही सप्रेम भेट देण्यात आला. 

याप्रसंगी माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे,माजी उपनगराध्यक्ष यादवेंद्र खळदे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पोळ, सुरेश धोत्रे, यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केली.


माजी नगरसेवक प्रकाश ओसवाल,अरुण माने प्रादेशिक परिवहनचे माजी अधिकारी हरिश्चंद्र गडसिंग,रोटरी सिटीचे अध्यक्ष किरण ओसवाल,सहप्रांतपाल दीपक फल्ले,विलास काळोखे, सीआरपीएफ चे अधिकारी जे पी प्रकाश सर तसेच

सुशीला मंगल कार्यालयाच्या संस्थापक सुशीलाताई हिरालाल परदेशी,डॉ अनंत परांजपे,डॉ शालिग्राम भंडारी,नंदकुमार शेलार,गणेश खांडगे,संतोष खांडगे,माजी तहसीलदार रामभाऊ माने, रोटरी एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार,भास्कर भेगडे, दिलीप पारेख, दादा उऱ्हे, मनोज ढमाले,श्रीराम कुबेर,लक्ष्मण माने, रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी चे सर्व सदस्य, गोल्डन ग्रुपचे सर्व सदस्य,SKF बेरिंग कंपनीतील सर्व सहकारी धर्मवीर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक खंडूजी टकले विद्यमान अध्यक्ष विनोद टकले व सर्व संचालक मंडळ परदेशी परिवारातील शांताराम परदेशी यांचे सर्व बंधू पुतणे,नातू,नातवंडे भोई समाजातील सर्व प्रतिष्ठित हितचिंतक फ्रेंड्स क्लब मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य आवर्जून उपस्थित होते. सुग्रास अशा स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी तर आभार प्रदर्शन संतोष परदेशी यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन गोल्डन ग्रुपच्या सदस्यांनी केले.




लेटेस्ट अपडेट्स