वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याची भटकंती थांबणार वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले

198 views

वडगाव मावळ दि.21 (प्रतिनिधी) वनपरिक्षेत्र - शिरोता अंतर्गत वनपरिमंडळ- उकसान मधील राकसवाडी मध्ये वन्यजीवांची पिण्याच्या पाण्याची भटकंती थांबण्यासाठी पाणवठा मध्ये वन्य प्राण्यांसाठी पाणी सोडण्यात आले आहे. कायमच पाणवठा मध्ये पाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Author : Admin
Publisher : admin
Update : 4 days ago
Date : Tue Apr 22 2025

image

वडगाव मावळ दि.21 (प्रतिनिधी) वनपरिक्षेत्र - शिरोता अंतर्गत वनपरिमंडळ- उकसान मधील राकसवाडी मध्ये वन्यजीवांची पिण्याच्या पाण्याची भटकंती थांबण्यासाठी पाणवठा मध्ये वन्य प्राण्यांसाठी पाणी सोडण्यात आले आहे. कायमच पाणवठा मध्ये पाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

 याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता सोमनाथ ताकवले, वनपरिमंडळ अधिकारी एम बी घुगे, जी ए भोसले, डी डी उबाळे, एस बी साबळे, वनमजूर घुले व कर्मचारी उपस्थित होते. नाणे मावळ मध्ये ९ पाणवठा बनवले आहेत आणि आंदर मावळ मध्ये २७ पाणवठा ची सोय केलेली आहे.

एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यासाठी नागरीवस्तीत जाण्याची वेळ येऊ नये. पाण्यासाठी वन्यजीवांची महामार्ग, द्रुतगती, लोहमार्ग व खासगी जागेत भटकंती होत असल्याने वन्यजीवांचे बळी जाण्याच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाने पाणवठा उभारले असून त्यात दैनंदिन पाणी सोडले जात आहे.

मावळ तालुका वन विभागाचे नागरिकांनी तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने ही वनविभागाचे या कामाचे स्वागत केले आहे.

लेटेस्ट अपडेट्स