57 views
वडगाव मावळ दि.17 (प्रतिनिधी) मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे (दि.15 एप्रिल) जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज अवैध ठरविण्यात आलेल्या तीन उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत सहकार खात्याकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला असून त्याबाबत न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत सोमनाथ बबन कोंडे, विशाल वसंतराव वहिले, संजय रामदास वाजे या तीन उमेदवारांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था मर्या., वडगाव मावळ यांना तक्रार अर्ज दिला असून याची प्रत सहकार आयुक्त राज्य, सहकार आयुक्त जिल्हा व सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना पाठविली आहे.
यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज छाननी प्रक्रियेत सहकार नियमांचे उल्लंघन झाले असून निवडणुकीची योग्य प्रक्रिया राबवली नसल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे.
निवडणूक प्रक्रियेसाठी काही अर्ज अवैध ठरवले व त्यानंतर काही अवैध ठरविलेले अर्ज वैध ठरविण्यात आले याबाबत सर्व निवडणूक प्रक्रियेसंदर्भात संभ्रम अवस्था निर्माण केल्याचे म्हटले आहे.
तसेच ग्रामोद्योग संघाने मागील दहा वर्ष कर्ज वितरण केलेले नसून कर्ज वाटपा बाबत व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज पुरवठा घेणे बाबत देखील निकषपुढे आल्याचे म्हटले आहे. खादी ग्रामोद्योग संघाने सदस्य संख्या वाढीसंदर्भात अर्ज न देणे अर्थात ही संस्था सहकारी आहे का? स्वायत्त आहे ? याबाबतचा खुलासाही करावा असे या तक्रार अर्जात म्हटले आहे.
पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवावी अशी मागणी असून निवडणूक नियमांचे योग्य पालन व संविधानिक कार्यपद्धती व शासनाचे नियमांचे पालन व्हावे अशी विनंतीही या तक्रार अर्जात करण्यात आलेली आहे.