39 views
वडगाव मावळ दि.8 (प्रतिनिधी) येथील श्री जैन स्थानकवासी श्रावक संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ व्यापारी सुभाषचंद्र अंबरचंद मुथा यांची बिनविरोध निवड करण्यात आली , जैन संघाच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते जाहीर करण्यात आला.
उपाध्यक्ष पदी कांतीलाल बाफना
खजिनदार पदी सनी सुराणा आणि सचिव पदी डॉ.सुनील बाफना यांची निवड करण्यात आली.
वडगांव जैन स्थानक येथील बैठकीत राजेश बाफना , मोतीलाल बाफना, अशोकलाल गुजराणी , सुरेंद्र बाफना , झुंबरलाल कर्णावट , रमेशलाल गुजराणी, संदीप बाफना, अजित मुथा , अमोल मुथा , आनंद बाफना , विजय बलदोटा , प्रशांत गुजराणी, दिलीप बलदोटा , संजय गांधी , शशिकांत कुंकुलोळ, युथ ग्रुपचे प्रीतम बाफना , अमोल बाफना , रोहन मुथा , आशिष बाफना , गिरीश गुजराणी , अमित मुथा, आतिश कर्णावट, साहिल बाफना , आदेश्वर बाफना , ओंकार चोरडिया , वितराग मुथा आदी उपस्थित होते.
मावळ तालुक्याची राजधानी असलेल्या वडगांव मावळ येथे प्रतिवर्षी शेकडो साधू , संत , साध्वीजी यांचे आगमन होत असते , या माध्यमातून चातुर्मास , पर्व पर्युषण तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेक साधर्मिक आणि सामाजिक उपक्रम , विविध स्पर्धा यांचे आयोजन या जैन संघाचे पदाधिकारी , ज्येष्ठ सदस्य , महिला मंडळ, युथ ग्रुप आणि पाठशाळा मंडळ या सर्वांना सोबत घेऊन राबविण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचीत अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा यांनी दिली.
या निवडीबद्दल वडगांव श्री संघाच्या वतीने राजेश बाफना यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
प्रीतम बाफना यांनी सूत्रसंचालन केले आणि अमोल बाफना यांनी आभार प्रदर्शन केले.