232 views
वडगाव मावळ दि. 9 (प्रतिनिधी) विद्यार्थी जीवनात आपले लक्ष ध्येयावर आत्मविश्वासाने ठेवल्यावर यश नक्की मिळते. स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय अधिकारी होण्याची संधी गमवू नका. नियमित अभ्यास, व्यायामाची सवयच जीवनाला दिशा देऊ शकते. विद्यार्थ्यांनी कलागुण ओळखून त्या क्षेत्रात करिअर ची संधी ओळखावी. असे प्रतिपादन मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम यांनी केले.
श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ कला वाणिज्य बीबीए महाविद्यालयात सोमवारी (दि.7) सकाळी 10 वा. क्षणिक वर्ष 2024-25 नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अशोक बाफना होते.
प्रसिद्ध व्याख्याते प्रा.प्रदीप कदम यांनी आजचा विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यान दिले. संचालक राज खांडभोर यांनी विद्यार्थ्यांना भाषण केले.
याप्रसंगी वडगाव नगरपंचायत संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, सचिव अशोक बाफना, संचालक राज खंडाभोर, शरद मालपोटे, प्राचार्य अशोक गायकवाड, प्रा. महादेव वाघमारे, डॉ. शीतल दुर्गाडे, प्रा.शीतल शिंदे, प्रा. रोहिणी चंदनशिवे, प्रा.योगेश जाधव, डॉ. जया धावारे, प्रा. प्रियांका पाटील, प्रा. मोहिनी ठाकर, प्रा. अशोक कोकाळे, प्रा. अनिल कोद्रे व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात "संस्थेचे सचिव अशोक बाफना म्हणाले या महाविद्यालयातुन हजारो विद्यार्थी शिकून विविध क्षेत्र यशस्वी झाले आहेत. आजचा विद्यार्थी उद्याचा भावी नागरिक असून विद्यार्थी दशेत बदलते तंत्रज्ञान अद्ययावत ठेवणे काळाची गरज आहे. कोरोना व कोरोना नंतरचे जग बदललेलं असून ऑनलाइन शिक्षण पद्धती रुजली आहे."
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अशोक गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.रोहिणी चंदनशिवे यांनी केले. आभार डॉ.शीतल दुर्गाडे यांनी मानले.