चिखलसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती भाऊसाहेब पाराटे यांची बिनविरोध निवड

122 views

वडगाव मावळ दि.27 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यातील चिखलसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी स्वाती भाऊसाहेब पाराटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 month ago
Date : Thu Feb 27 2025

image




उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या पदासाठी पाराटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची माहिती ग्रामसेवक अधिकारी गोमसाळे यांनी दिली.


याप्रसंगी सरपंच सचिन काजळे, सदस्या वैशाली खंडू काजळे, सविता सोमनाथ काजळे, शोभा स़ंभाजी शिंदे, संतोष शेडगे,

रोहित दाभाडे, किसन काजळे, निलेश चव्हाण, बळीराम चव्हाण, डाॅ गणेश जाधव आदी उपस्थित होते.

चिखलसे येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी या हेतूने उपसरपंच संतोष शेडगे यांनी स्वखुशीने उपसरपंच पदाचा राजीनामा दिला.या रिक्त जागेसाठी सरपंच सचिन काजळे यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेण्यात आली उपसंरपच पदासाठी स्वाती भाऊसाहेब पाराटे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने उपसंरपचपदी स्वाती भाऊसाहेब पाराटे बिनविरोध निवड झाली असल्याचे घोषित करण्यात आले.


यावेळी नवनिर्वाचित उपसंरपच स्वाती भाऊसाहेब पाराटे यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पारंपारिक पध्दतीने वांजत्री ताफा लावून भंडाराची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी समस्त ग्रामस्थ व सर्व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.




लेटेस्ट अपडेट्स