नानासाहेब नवले, दत्तात्रय जाधव व चेतन भुजबळ मोठ्या मताधिक्याने विजयी

24 views

वडगाव मावळ दि.6 (प्रतिनिधी) श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय श्री संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलने जोरदार विजय मिळवत तिन्ही जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, दत्तात्रय जाधव व चेतन भुजबळ हे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 day ago
Date : Sun Apr 06 2025

imageविजयी उमेदवार


निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार,

विजयी उमेदवारांना मिळालेली मते: नानासाहेब नवले – ८५२४ मते,

दत्तात्रय जाधव – ८३८० मते, चेतन भुजबळ – ७१८९ मते, अपक्ष बाळासाहेब भिंताडे – २५०५ मते, एकूण वैध मतपत्रिकांची संख्या – ९५१५ अवैध मतांची संख्या – ११२, ४२.८९ टक्के मतदानाची नोंद


शनिवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत २२,२५८ मतदारांपैकी ९,५४६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पिंपरी (८८.७०%) आणि इंदोरी अ (८८.७६%) येथे सर्वाधिक मतदान झाले. तर लोणावळा येथे केवळ १४.१९% प्रतिसाद मिळाला. तळेगाव, पिरंगुट व चाकणमध्येही अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले. मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार


रविवारी सकाळी वाकड येथील द्रोपदा लॉन्स येथे तीन फेऱ्यांत मतमोजणी पार पडली. २० टेबल्सवर ४० कर्मचारी तैनात करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दुपारी साडेबारा वाजता अधिकृत निकाल जाहीर केला.


मतदान प्रक्रियेसाठी ३५० निवडणूक कर्मचारी आणि १०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुळशी, मावळ, खेड, हवेली व शिरूर या पाच तालुक्यांतील एकूण ४६१ गावांमध्ये ५७ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती.

बिनविरोध विजयी झालेले संचालक (एकूण १८) 

ऊस उत्पादक गट क्र. २ (पौड-पिरंगुट):

1. ढमाले धैर्यशील रमेशचंद्र (बेलावडे, ता. मुळशी)

2. गायकवाड यशवंत सत्तू (नाणेगाव, पो. कुळे, ता. मुळशी)

3. उभे दत्तात्रय शंकर (कोळावडे, ता. मुळशी)

ऊस उत्पादक गट क्र. ३ (तळेगाव-वडगाव):

4. दाभाडे ज्ञानेश्वर सावळेराम (माळवाडी, पो. इंदोरी, ता. मावळ)

5. भेगडे बापूसाहेब जयवंतराव (तळेगाव दाभाडे, ता. मावळ)

6. काशिद संदीप ज्ञानेश्वर (इंदोरी, ता. मावळ)

ऊस उत्पादक गट क्र. ४ (सोमाटणे-पवनानगर):

7. कडू छबुराव रामचंद्र (पाचाणे, पो. चांदखेड, ता. मावळ)

8. लिम्हण भरत मच्छिंद्र (सांगवडे, पो. साळुंब्रे, ता. मावळ)

9. बोडके उमेश बाळू उर्फ बाळासाहेब (गहुंजे, पो. देहूरोड, ता. मुळशी)

ऊस उत्पादक गट क्र. ५ (खेड-शिरूर-हवेली):

10. लोखंडे अनिल किसन (मरकळ, ता. खेड)

11. भोंडवे धोंडिबा तुकाराम (शिंदे वस्ती, रावेत, ता. हवेली)

12. कोतोरे विलास रामचंद्र (चिंबळी, ता. खेड)

13. काळजे अतुल अरुण (काळजेवाडी, चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली)

महिला राखीव

14. अरगडे ज्योती केशव (काळुस, ता. खेड)

15. वाघोले शोभा गोरक्षनाथ (दारुंब्रे, पो. साळुंब्रे, ता. मावळ)

अनुसूचित जाती-जमाती:

16. भालेराव लक्ष्मण शंकर (काले, पो. पवनानगर, ता. मावळ)

इतर मागासवर्ग:

17. कुदळे राजेंद्र महादेव (सुभाषनगर, शुक्रवार पेठ, पुणे)

विमुक्त जाती/भटक्या जमाती:

18. कोळेकर शिवाजी हरिभाऊ (कोयाळी तर्फे चाकण, ता. खेड)

शेतकरी विकास पॅनेलचा दणदणीत विजय 


या निवडणुकीत श्री संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलने प्रचंड मतांनी विजय मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. नूतन संचालक मंडळासमोर कारखान्याचा सर्वांगीण विकास, ऊस उत्पादकांच्या समस्या सोडवणे व पारदर्शक कारभार ही महत्त्वाची उद्दिष्टे असणार आहेत.




लेटेस्ट अपडेट्स