undefined पोलिसांची कारवाई

1836 views

लोणावळा दि.28 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यात पान टपरीमध्ये गांजा एम डी पावडर पानात मिसळून शाळा व महाविद्यालयातील मुलांना सर्रासपणे विक्री करणाऱ्या पान टपऱ्यांवर शुक्रवारी (दि.28) लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी बेधडक कारवाई केली.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 month ago
Date : Fri Feb 28 2025

image

 लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार पानटपरीवर गांजा, एम.डी पावडर यांची पानामध्ये मिसळून शाळा व कॉलेज मधील मुलांना सर्रासपणे विक्रीकेली जाते असल्याची माहिती मिळाल्याने 


लोणावळा शहरातील प्रेम बाळासाहेब जाधव (वय १९ रा. शिलाटणे ता. मावळ पान स्टॉल नाव चैतन्य पान शॉप-रायचूड मंदीर रोड),  नरेश नगाराम सुर्यवंशी (वय ४५ रा.लोणावळा ता. मावळ पान स्टॉल नाव नरेश पान शॉप), विनायक शंकर दहिभाते (वय २८ रा. कामशेत ता. मावळ पान स्टॉल नाव साईरतन पान शॉप ), निखील हरिदास आझाणकर (वय २४ रा. पांगोळली ता. मावळ पान स्टॉल नाव महालक्ष्मी पान शॉप) व राहुल सुनिल शेलार (वय २१ रा. औंढे ता. मावळ पान स्टॉल नाव पैलवान पान शॉप याठिकाणी जावून सदर टपरीची तपासणी केली असता सदर टपरी मध्ये मिळुन आलेल्या पावडर व इतर पानात मिक्स करणारे साहित्य ताब्यात घेण्यात आलेले असुन सदर पावडर व इतर साहित्य तपसाणी करीता अन्न व औषध प्रशासन पुणे यांच्याकडे तपासणी करीता पाठविण्यात येणार असुन अन्न व औषध प्रशासनाचा रिपोर्ट आल्यानंतर सदर पानटपरी मालक व चालक यांच्या विरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

तसेच लोणावळा शहर व ग्रामीण पान टपरी मालक व चालक यांनी पानटपरीवर १८ वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणार नाही, पानटपरी वेळेत बंद करणे व पानटपरी मध्ये १८ वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ दिले व विकत देणार नाहीत याबाबतचा फ्लेक्स बोर्ड तयार करुन लावण्यात यावा पानटपरी मध्ये सी.सी.टि.व्ही कॅमेरा लावणे इत्यादी सक्त सूचना लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी दिल्या आहेत तसेच पोलीस स्टेशन कडुन टपरी चालक व मालक यांना पानटपरी बाबत योग्य ती कायदेशीर लेखी नोटीस देण्यात येणार आहेत व लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी यांना शाळा व महाविद्यालयाच्या १०० मिटरच्या आवारातील तंबाखु व इतर तत्सम पदार्थ विकणा-या पान पटरी वर तात्काळ कारवाई करणे बाबतचे लेखी पत्र देण्यात आलेले आहे.

ही धडक कारवाई सहा पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या उपस्थिती व लोणावळा शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक, राहुल लाड, पोलीस अंमलदार शेखर कुलकर्णी, हनुमंत शिंदे, आदित्य भोगाडे, अंकुश पवार, पवन कराड आदींचा समावेश होता.




लेटेस्ट अपडेट्स