109 views
वडगाव मावळ दि.4 (प्रतिनिधी) 204 मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात 6 उमेदवार असून त्यांना चिन्ह वाटप करण्यात आले आहेत. 6 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अशी माहिती सोमवारी (दि.4) दुपारी 3:30 वा. निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिली.
निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार पक्ष व चिन्ह खालील प्रमाणे
1) सुनिल शंकरराव शेळके राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चिन्ह घड्याळ,
2) रविंद्र नानाभाऊ वाघचौरे भीम सेना
चिन्ह ऑटो रिक्षा,
3) अगरवाल मुकेश मनोहर अपक्ष
चिन्ह कपाट,
4) अण्णा ऊर्फ बापू जयवंतराव भेगडे चिन्ह ट्रम्पेट
5) पांडूरंग बाबुराव चव्हाण अपक्ष चिन्ह शिट्टी,
6) गोपाळ यशवंतराव तंतरपाळे अपक्ष चिन्ह प्रेशर कुकर,
उमेदवारी अर्ज मागार खालील प्रमाणे
[वैधमणे नामनिर्दिष्ट उमेदवाराचे नाव]
1) विधान सुधीर तरफदार,
2) दादासाहेब किसन यादव,
3) रविंद्र आणासाहेब भेगडे,
4) सुरेश्वरी मनोनजकुमार ढोरे,
5) रुपाली राजेंद्र बोचकेरी
6) संतोष रंजन लोखंड
मावळ तालुक्यात सुनील शेळके व बापूसाहेब भेगडे अशी प्रमुख दुरंगी लढतीचे चिन्ह दिसत आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी उमेदवार 204 मावळ विधानसभा निवडणुकीत केवळ 6 उमेदवार आहेत.