583 views
वडगाव मावळ दि.31 (प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघात दाखल झालेल्या एकूण 18 उमेदवारी अर्जामधून छाननीत बुधवारी (दि.30) सहा उमेदवारांचे अर्ज अवैध झाले आहेत. तर एकूण 12 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. 4 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे.
मावळ विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मंगळवारी (दि.29) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतेपर्यंत एकूण 18 उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. 18 उमेदवारांनी मिळून एकूण 26 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. बुधवारी (दि.30) दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. त्यात 6 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज विविध कारणांमुळे अवैध झाले. तर 12 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
निवडणूक रिंगणात उरलेले उमेदवार सुनील शंकरराव शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), रवींद्र नानाभाऊ वाघचौरे (भिम सेना), रुपाली राजेंद्र बोचकेरी (भारतीय लोकशक्ती पार्टी), अगरवाल मुकेश मनोहर (अपक्ष), अण्णा उर्फ बापू जयवंतराव भेगडे (अपक्ष), गोपाल यशवंतराव तंतरपाळे (अपक्ष), दादासाहेब किसन यादव (अपक्ष), पांडुरंग बाबुराव चव्हाण (अपक्ष), बिधान सुधीर तरफदार (अपक्ष), रवींद्र आण्णासाहेब भेगडे (अपक्ष), सुरेश्वरी मनोजकुमार ढोरे (अपक्ष), संतोष रंजन लोखंडे (अपक्ष)