207 views
वडगाव मावळ दि.20 (प्रतिनिधी) येथील शीतल हॉटेलच्या अशिष कंपनीच्या अडचणीत अडकलेल्या गुरुवारी (दि.19) रात्री सांबरची वडगाव मावळ वनविभाग व वन्यजीव रक्षक मावळ यांच्याकडून सुखरुप सुटका करण्यात आली.
डॉ.अनिकेत नंदकुमार काळोखे यांना आशिष कंपनीच्या परिसरात सांबर ओरडत असल्याचा आवाज ऐकू आला. घटनास्थळाची पाहणी केली असता, सांबर कंपनीत अडचणीत अडकलेले दिसले. डॉ. अनिकेत काळोखे यांनी वनविभाग मावळ व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना माहिती दिली. त्वरित निलेश गराडे, जिगर सोलंकी, सार्जेश पाटील, रोहित पवार, गणेश ढोरे, निनाद काकडे, अनिश गराडे घटनास्थळी पोहोचले, त्याठिकाणी एक नर सांबर अडचणीच्या जागेत एका दोरीत अडकले होते.
वडगाव वनविभाग यांचे वनरक्षक पी. कासोले, य. कोकाटे, एस, मोरे व इतर टीमच्या परिश्रमानंतर सांबरची सुखरुप सुटका करून प्राथमिक तपासणी केली. जखमी नसल्याने लगेच वनपरिक्षेत्रात सोडून देण्यात आले. मुक्त कऱ्यनात आले. या वेळीस भीम सिंह सोनार, प्रेम सिंह सोनार व इतर कंपनी चे कर्मचारी यांनी पण खूप मदत केली.
कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळून आल्यास जवळच्या प्राणीमित्रला किंवा वनविभागला संपर्क (1926) करा असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश गराडे 9822555004 व अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले.
मावळ तालुक्यात हजारो हेक्टर वनक्षेत्र असून डिसेंबअखेर वनक्षेत्रातील पाण्याचे स्त्रोत कमी होत असल्याने वन्यजीव अन्न व पाण्याच्या शोधात नागरिक वस्तीत घुसत असल्याने अनेक वन्यजीवांचा बळी गेला आहे. त्यातच महामार्ग, द्रुतगती मार्ग, लोहमार्ग, त्यातच धनिकांनी वनक्षेत्रातील केलेले अतिक्रमण, अनेक ठिकाणी काटेरी तारांचे कुंपण असल्याने वन्यजीवांना धोकाच धोका आहे. दरवर्षी शेकडो वन्यजीवांचा बळी जात आहे. नुकतीच पिंपळोली हद्दीत बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या वतीने वन व वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणे काळाची गरज आहे.