1031 views
वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) पंढरपूर बस अपघातातील गंभीर जखमी सुरेखा सहादू म्हाळसकर वय 52 रा. नाणे ता. मावळ यांचा उपचारादरम्यान सोमवारी (दि.13) पहाटे 6 वा मृत्यू झाला.
नाणे मावळ येथून देव दर्शनासाठी निघालेल्या बसची ट्रकला जोरात घडक होवून दि.29/12/24 पहाटे 6:10 वा भटुंबरे पंढरपूर जवळ
अपघात झाला. या अपघातातील मृत्यूंची संख्या तीन झाली आहे.
सोमवारी (दि.13) पहाटे 6 वा. सुरेखा सहादू म्हाळसकर वय 52 रा. नाणे ता. मावळ यांचे उपचारादरम्यान सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला.
अपघाताच्या दिवशी बिबाबाई सोपान म्हाळसकर (वय 62)
व जानवी विठ्ठल म्हाळसकर (वय 12) यांचा मृत्यू झाला.
एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला.
एकूण 28 जण जखमी होते. त्यात सातजण गंभीर जखमी होते. त्यापैकी आता अंजली संतोष राक्षे व संतोष मारुती राक्षे दोघेजण चाकण येथील युनिकेअर हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत. सातजण सद्यस्थिती उपचारच घेत आहेत. या जखमींच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे. औषधोचारासाठी लाखोंचा खर्च होत आहे.
या घटनेने मावळ मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.