226 views
वडगाव मावळ दि.14 (प्रतिनिधी) ब्राम्हणवाडी (साते) दिनेश बाळू शिंदे वय 31 यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी (दि.13) सकाळी 10: 30 वा. निधन झाले.
सोमवारी पहाटे उलटी झाल्याने सकाळी वडगाव, तळेगाव दाभाडे शेवटी सोमाटणे फाटा पवना हॉस्पिटल मध्ये उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मागे. पत्नी 3 वर्ष वयाची व दीड वर्ष वयाची अश्या लहान मुली आहेत. रेल्वे विभाग नोकरीसाठी पर्यंत करत होता, सोमवारी रेल्वे विभागातून नोकरीचे पत्र मिळणार होते. उच्च शिक्षित असून कुटुंबासाठी कायमच मिळेल ते काम करायचा, मितभाषी, सर्वांशी नम्र व्यवहार त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी भाऊ व बहीण दोन मुले असा परिवार आहे.
दुग्ध व्यावसायिक बाळू झुंगाजी शिंदे यांचा मुलगा, महेश शिंदे यांचा भाऊ होत.
खापरे ओढा स्मशानभूमीत सोमवारी (दि.13) सायंकाळी 5:30 वा. अंत्यसंस्कार करण्यात आले.