48 views
पिंपरी दि.16 (प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) चे प्रा. योगेश विनोद भावसार यांना पुणे येथील श्री बालाजी विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. भावसार यांनी "भारतीय उत्पादन क्षेत्रातील दीर्घकालीन एकीकरणाचे आर्थिक कामगिरीचे विश्लेषण" या विषयावर शोधप्रबंध सादर केला. डॉ. भावसार हे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) या संस्थेमध्ये रजिस्ट्रार व ओएसडी या पदावर कार्यरत आहेत.
तसेच त्यांचा वरील विषयावर आधारीत शोधप्रबंध तुर्की येथे ऑनलाईन जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. डॉ. लिना डाम यांचे मार्गदर्शन लाभले.
या पदवी प्रदान सोहळ्यात बालाजी विद्यापीठाचे कुलपती परमानंदम यांच्या हस्ते डॉ. भावसार यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी पॅनासोनीक इंडिया कंपनीचे प्रमुख आदर्श मिश्रा, बालाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जी. के. शिरोडे, रजिस्ट्रार डॉ. एस. बी. आगाशे तसेच प्रा. भाग्यश्री भावसार, मोहनीश भावसार आदी उपस्थित होते. डॉ. भावसार हे वयाच्या २९ व्या वर्षी २०१० साली राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्वात तरुण रजिस्ट्रार म्हणून सेवेत रुजू झाले होते.
पिंपरी चिंचवड एजुकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी प्रा. डॉ. योगेश भावसार यांचे अभिनंदन केले.