83 views
वडगाव मावळ दि.6 (प्रतिनिधी) कोल्हापूर आविष्कार सोशल अँड फौंडेशनचा राज्यस्तरीय क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले गुणवंत शिक्षक 2025 चा पुरस्कार 2025 येथील कला,वाणिज्य व बीबीए महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक दादू गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.
श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला,वाणिज्य व बीबीए महाविद्यालय मागील 17 वर्षांपासून अध्यापन तसेच प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे महाराष्ट्रात आई या विषयावर काव्य सादरीकरण कार्यक्रम होतात. प्रा.अशोक गायकवाड हे आंबेडकरी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असतात.
आविष्कार सोशल अँड फौंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. संतोष भोसले, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार, सातारा जिल्हाध्यक्ष मुरलीधर पवार आदींच्या उपस्थितीत 3 जानेवारी हा दिवस महिला शिक्षणाच्या अद्य प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने महिला सबलीकरण चळवळ जागृत ठेवण्यासाठी शिक्षकांचा विशेष सन्मान सोहळा रविवारी (दि.5) शिरवळ सातारा येथे संपन्न झाला त्यात पुरस्कार देण्यात आला .