आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त दि.19 ते 28 सप्टेंबर रोजी महाआरोग्य शिबिर

448 views

वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे हे सातवे वर्ष असून 19 ते 28 सप्टेंबर 2024 कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कान्हे उपजिल्हा रुग्णालय येथे शिबिर होणार आहे. तसेच मावळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत या आरोग्य शिबिराचा लाभ मिळावा यासाठी विविध स्तरावर जनजागृती करण्यात येणार आहे.


Author : Admin
Publisher : admin
Update : 3 days ago
Date : Sun Sep 15 2024

imageमहाआरोग्य शिबीर


माय माऊली ज्येष्ठ नागरिक संघ मावळ, श्री विठ्ठल परिवार मावळ, कुलस्वामिनी महिला मंच मावळ या संस्था संयोजन करणार आहेत.


शिबिरात एमआरआय तपासणी, सीटी स्कॅन तपासणी, सोनोग्राफी, एक्स-रे, रक्त तपासणी, चष्मे, औषधे, श्रवण यंत्र या सुविधांबरोबरच मोफत रुग्णवाहिका सेवा देखील देण्यात येणार आहे.


तब्बल 25 प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया व उपचार


शिबिराच्या अंतर्गत हृदयाच्या शस्त्रक्रिया, अन्ननलिका शस्त्रक्रिया. मोतीबिंदू, हाडांचे फॅक्चर, कान नाक-घसा शस्त्रक्रिया, श्वसनालिकेच्या शस्त्रक्रिया, अंगावरील मोठ्या चरबीच्या गाठीची शस्त्रक्रिया, मणक्याच्या, किडनीच्या, गर्भपिशवीच्या, मुतखड्याच्या, सांध्याच्या, अपेंडिक्सच्या, मूळव्याधीच्या शस्त्रक्रिया, मॅमोग्राफी, हर्निया, पित्ताशय किंवा पित्ताशयातील खड्यांची शस्त्रक्रिया, कॅन्सर संदर्भात शस्त्रक्रिया, गर्भाशयातील गाठींची शस्त्रक्रिया, डोळ्यांचा तिरळेपणा व अन्य समस्यांबद्दल शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारावरील (Maval) उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. तसेच श्रवणयंत्र, चष्मे, रक्त तपासणी आणि नेत्र तपासणी देखील मोफत करण्यात येणार आहे. यासाठी रुग्णांनी आधार कार्ड, रेशनिंग कार्ड आणि जुन्या आजाराचे मेडिकल रिपोर्ट सोबत घेऊन यायचे आहे.




निरोगी मावळचा संकल्प करणारे हे महाआरोग्य शिबिर गुरुवार दिनांक 19 ते 28 सप्टेंबर या काळात उपजिल्हा रुग्णालय कान्हे येथे आयोजित केले आहे. एकाच दिवशी गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक गावनिहाय दिवस ठरविण्यात आला आहे.


देहूगाव, इंदोरी, आंबी परिसर


गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी देहू शहर सुदुंबरे, सुदवडी, जांभवडे, इंदोरी, माळवाडी, वराळे, नाणोली तर्फे चाकण, आंबी, वारंगवाडी, नवलाख उंबरे, बधलवाडी, जाधववाडी, परीटेवाडी, मिंडेवाडी, गोळेवाडी, मंगरूळ, शेटेवाडी, कदमवाडी आणि आंबळे या गावांतील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे.

सोमाटणे, बेबेड ओहोळ, चांदखेड परिसर


शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सोमाटणे, शिरगाव, गहुंजे, साळुंब्रे, (Maval) गोडुंब्रे, सांगवडे, दारूंब्रे, कुसगाव, पाचाणे, पुसाणे, दिवड, ओवळे, डोणे, आढले बु., आढले खु., चांदखेड, देवगड, बेबडओहोळ, परंदवडी, धामणे, पिंपळखुटे, शिवणे, मळवंडी ढोरे, थुगाव, आर्डव या गावांतील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे.


वडगाव-कामशेत परिसर


शनिवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी वडगाव मावळ, कामशेत, कातवी, जांभूळ, सांगवी, ब्राह्मणवाडी, मोहितेवाडी, साते, कान्हे, अहिरवडे, नायगाव, चिखलसे, कुसगाव खु., खामशेत, टाकवे बु., फळणे, बेलज, राजपुरी या गावांतील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे.


पवन मावळ परिसर


सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी उर्से, आढे, ओझर्डे, सडवली, बऊर, येलघोल, धनगव्हाण, शिवली, भडवली, कोथुर्णे, मळवंडी ठुले, वारू, ब्राह्मणोली, गेव्हंडे खडक, ठाकूरसाई, तिकोना, गेव्हंडे वसाहत, जवण 1,2,3 अजिवली, शिळींब, वाघेश्वर, कादव, चावसर, मोरवे, तुंग, कोळे, चाफेसर, पानसोली या गावांतील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे. (Maval)


मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी गोवित्री, वडवली, वळवंती, कोळवाडी, भाजेगाव, सोमवडी, शिरदे, आपटी, थोरण, जांभवली, उकसान, पाले ना.मा., करुंज, बेडसे, कडधे, गेव्हंडे, येळसे, शेवती वसाहत, सावंतवाडी, निकमवाडी, प्रभाचीवाडी, धालेवाडी. धामणदरा, मालेवाडी, पवनानगर, काले, आंबेगाव, शिंदगाव, दुधिवरे, लोहगड या गावांतील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे.


आंदर मावळ परिसर


बुधवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी नागाथली, वहानगाव, कुसवली, बोरवली, काम्ब्रे आ.मा., डाहुली, बेंदेवाडी, कुसूर, खांडी, सावळा, पाथरगाव, ताजे, पिंपळोली, बोरज, मळवली, पाटण, भाजे, देवले, सदापूर, कार्ला, वेहेरगाव, दहिवली, शिलाटणे, टाकवे खु., फांगणे, मुंढावरे, वाडीवळे, वळक, बुधवडी, संगिसे, वेल्हवडी, नेसावे, खांडशी, उंबरवाडी या गावांतील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे.



नाणे मावळ परिसर


गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी करंजगाव, साबळेवाडी, ब्राह्मणवाडी, कांब्रे ना.मा., कोंडीवडे ना.मा., नाणे, नवीन उकसान, नाणोली, साई, पारवाडी, वाउंड, कचरेवाडी, घोणशेत, माऊ, वडेश्वर, शिंदे/घाटेवाडी, मोरमारवाडी, गभालेवाडी, डोंगर/सटवाईवाडी, कोंडीवडे ना.मा., भोयरे, कल्हाट, पवळेवाडी, निगडे, शिरे, कशाळ, किवळे, इंगळून, पारीठेवाडी, अनसुटे, कुणे, कुणेवाडी, माळेगाव खु., पिंपरी, तळपेवाडी, माळेगाव बु. या गावांतील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे.


लोणावळा परिसर


शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी लोणावळा, ओळकाईवाडी, गुरववस्ती, कुसगाव बु., भैरवनाथनगर, प्रेमनगर, औंढे, कुसगाववाडी, केवरे वसाहत, डोंगरगाव, डोंगरगाववाडी, औंढोली, कुरवंडे, कुणे ना.मा., राजमाची, उंडेवाडी, पांगळोली, वरसोली, वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी या गावांतील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे.


तळेगाव व देहूरोड


शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे आणि देहूरोड छावणी परिषद येथील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे.


25 रुग्णालयांचे सहकार्य


शिबिरामध्ये मायमर हॉस्पिटल तळेगाव दाभाडे, वाय सी एम हॉस्पिटल - पिंपरी, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल - पिंपरी, पायोनिअर हॉस्पिटल सोमाटणे, नित्यसेवा

हॉस्पिटल - कार्ला, डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल - पिंपरी, न्यू इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल - आळंदी, स्टर्लिंग आयुर्वेदिक हॉस्पिटल, पवना हॉस्पिटल - सोमाटणे, सेवाधाम हॉस्पिटल तळेगाव दाभाडे, एनआयओ हॉस्पिटल पुणे, लाईफ पॉइंट हॉस्पिटल - वाकड, अॅकॉर्ड हॉस्पिटल मोशी, लोकमान्य हॉस्पिटल - चिंचवड, आदित्य बिर्ला हॉस्पिटल चिंचवड, आँको लाईफ हॉस्पिटल - तळेगाव दाभाडे, रुबी अल्केअर - पिंपरी, एम्स हॉस्पिटल औंध, संजीवनी हॉस्पिटल - लोणावळा, एच.व्ही. देसाई हॉस्पिटल पुणे, ढाकणे हॉस्पिटल - तळेगाव दाभाडे, ईशा आय केअर - चिंचवड, गुंजकर हॉस्पिटल - चिंचवड, बडे हॉस्पिटल सोमाटणे यांच्याकडून वैद्यकीय सेवा पुरवली जाणार आहे.


सहा डायग्नोस्टिक सेंटरचा सहभाग


शिबिरात साक्षी डायग्नोस्टिक सेंटर सोमाटणे, साक्षी डायग्नोस्टिक - लोणावळा, कृष्णा डायग्नोस्टिक - चिंचवड, मावळ इमॅजिन तळेगाव दाभाडे, एनसीएस पॅथालॉजी लॅब - कार्ला, साक्षी डायग्नोस्टिक - तळेगाव दाभाडे या केंद्रांच्या वतीने रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे.


मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन, माय माऊली ज्येष्ठ नागरिक संघ मावळ, श्री विठ्ठल परिवार मावळ आणि कुलस्वामिनी महिला मंच मावळ यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.




लेटेस्ट अपडेट्स

228 views
Image

मावळ तालुक्यातील तिन्ही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या

वडगाव मावळ दि.13 (प्रतिनिधी) वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव, शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार व सामाजिक वनीकरण मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी तनुजा शेलार आदींची पदोन्नतीने बदली झाली या तिन्ही पदाचा अतिरिक्त कार्यभार वनपरिक्षेत्र अधिकारी पुणे एस डी वरक यांच्या देण्यात आला आहे. त्यांच्याकडे एकूण 4 वनपरिक्षेत्राचा कार्यभार असल्याने कोणत्या वनपरिक्षेत्र कार्यालयाला वेळ देणार अशी परिस्थिती झाली आहे. तरी मावळ तालुक्यातील वडगाव मावळ, शिरोता व मावळ सामाजिक वनीकरण विभाग आदींना त्वरित वनपरिक्षेत्र अधिकारी नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


Read More ..