469 views
वडगाव मावळ दि.13 (प्रतिनिधी) वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव, शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार व सामाजिक वनीकरण मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी तनुजा शेलार आदींची पदोन्नतीने बदली झाली या तिन्ही पदाचा अतिरिक्त कार्यभार वनपरिक्षेत्र अधिकारी पुणे एस डी वरक यांच्या देण्यात आला आहे. त्यांच्याकडे एकूण 4 वनपरिक्षेत्राचा कार्यभार असल्याने कोणत्या वनपरिक्षेत्र कार्यालयाला वेळ देणार अशी परिस्थिती झाली आहे. तरी मावळ तालुक्यातील वडगाव मावळ, शिरोता व मावळ सामाजिक वनीकरण विभाग आदींना त्वरित वनपरिक्षेत्र अधिकारी नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांची पदोन्नती ने उपसंचालक (शिक्षण 1) चंद्रपूर विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने चंद्रपूर) येथे बदली झाली.
शिरोता वनपरिक्षेत्र सुशील मंतावार यांची पदोन्नती ने यांची सहाय्यक वन संरक्षक वाशीम येथे बदली झाली.
मावळ सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र अधिकारी तनुजा शेलार यांची पदोन्नती ने सहाय्यक वन संरक्षक (जैव विविधता) पुणे येथे बदली झाली.
वडगाव मावळ, शिरोता व मावळ सामाजिक वनीकरण आदींची पदे रिक्त असून या तिन्ही पदाचा अतिरिक्त कार्यभार एकाच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे असल्याने नागरिकांची कामे रखडली आहेत. पुणे - मुंबई महामार्गाच्या मध्यवर्ती असलेल्या मावळ तालुक्यात सुमारे 20 हजार हेक्टर वनक्षेत्र असुन त्यातील अतिक्रमण, वृक्षतोड, वन्यजीव शिकारी तसेच वृक्षारोपण संरक्षण संवर्धन आदी प्रश्न असल्याने
त्वरित या रिक्त जागेवर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे.