तळेगाव दाभाडे पणन मंडळाच्या एनआयपीएचटी संस्थेच्या अधिकारी कर्मचारी वेतानापासून वंचित

611 views

तळेगाव दाभाडे दि.10 (प्रतिनिधी) येथील पणन मंडळाच्या राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांपासून वेतन रखडले, 22 महिन्यांपासून महागाई भत्ता मिळाला नाही तसेच कालबध्द पदोन्नती 3 वर्षांपासून रखडली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांना जगण्यासाठी खाजगी सावकाराचा आश्रय घ्यावा लागत आहे.


Author : Admin
Publisher : admin
Update : 4 months ago
Date : Tue Sep 10 2024

imageवेतन


राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या संचालक पदाचा अतिरिक्त पदभार डॉ.सुभाष घुले यांच्याकडे आहे.

 या संस्थेत महिन्यांतून 1 ते 2 वेळा उपस्थित राहतात.

50 एकर जागेत 2002 साली स्थापन झालेल्या या संस्थेने 70,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना विविध पॉली हाऊस व शेड नेट या विषयावर प्रशिक्षण दिले आहे. संस्थेच्या आवारात मोठ्याप्रमाणात बांधकाम व नूतनीकरण करण्यासाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध होतो पण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च करताना निधी उपलब्ध करून दिला जात नाही.


संचालक यांना अतिरिक्त मानधन, वाहन, चालक व डिझेल आदी सुविधा दिल्या जातात. पूर्णवेळ संचालक नसल्याने संस्थेत अनागोंदी कारभार दिसत आहेत. आशिया खंडातील एकमेव संस्था असून अधिकारी व कर्मचारी उपाशी; संचालक तुपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  

या संस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांना जुलै ऑगस्ट महिन्याचे वेतन रखडले आहे. त्याचे 22 महिन्यांपासून महागाई भत्ता फरक दिला नाही. तसेच ऑगस्ट 2022 कालबद्ध पदोन्नती रखडली आहे.




वैद्यकीय बिले रखडली आहेत. अश्या परिस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गृह कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण, औषधोपचार व किराणा यासाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ आली आहे. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. गणेशोत्सव, गौरी सण कसा साजरा करावा. हा प्रश्न उपस्थित झाला आहे.





लेटेस्ट अपडेट्स

87 views
Image

“लोणावळा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापकांचे अल्फा-क्लोरालोज कीटकनाशकावर संशोधन व आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये शोधनिबंध प्रकाशित”

लोणावळा दि.3 (प्रतिनिधी) अल्फा-क्लोरालोज (α-chloralose) हा एक विषारी अंमली पदार्थ आहे, जो उंदरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच पक्षी मारण्यासाठी सर्रासपणे वापरला जातो. लोणावळा महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधकांनी प्रयोगशाळेत उन्नत स्पेक्ट्रोस्कोपिक तंत्रज्ञान, मॉलिक्युलर डाकिंग, सिमुलेशन आणि डीएफटी पद्धतींचा वापर करून मानवी शरीरातील रक्तात असलेल्या सिरम अल्ब्युमिन प्रथिनासोबत अल्फा-क्लोरालोज कीटकनाशकाची होणारी आंतरक्रिया उलगडली आहे. या संशोधनासंदर्भातला शोधनिबंध नुकतेच नेदरलँड येथून प्रकाशित होणाऱ्या “एल्सवेअर-जर्नल ऑफ मॉलिक्युलर लिक्विड, इम्पॅक्ट फॅक्टर ५.३” या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.


Read More ..