490 views
वडगाव मावळ दि.2 (प्रतिनिधी) डॉ. आंबेडकर ग्लोबल फउंडेशन नवी दिल्ली च्या वतीने मावळ तालुक्यातील श्री समर्थ रेस्टॉरंट चे मालक संतोष पांडुरंग भिलारे यांना उद्योग रत्न पुरस्कार , आढे गावच्या सरपंच सुनीता ज्ञानेश्वर सुतार यांना आदर्श सरपंच पुरस्कार व व्याख्याते विवेक गुरव यांना भारत भूषण पुरस्कार जाहीर झाला असून दिल्ली महाराष्ट्र सदन येथे शुक्रवारी (दि.3) दुपारी 1 वा. विविध क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
संतोष भिलारे या युवकाने संघर्षातून यशोशिखरावर मजल मारली आहे. संतोष भिलारे यांचे वडील वारल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी अंगावर आल्याने लहानपणापासूनच मिळेल ते काम करून उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविला. श्री समर्थ रेस्टॉरंटची सुरुवात करण्याच्या अगोदर वडगाव नगरपंचायत हद्दीत पुणे - मुंबई महामार्गाच्या लगत छोटी टपरी टाकून त्यात कपडे स्त्री चे दुकान सुरू केले.
त्यात ग्राहकांची मागणी ओळखून मटकी भेळ व मिसळ पाव व्यवसाय सुरू केला. महामार्गाच्या बाजूला दुकानाची सुरुवात करून दिवस रात्र संतोष भिलारे व त्यांची पत्नी नेहा भिलारे यांनी मेहनत करून काही वर्षातच महामार्गाच्या बाजूला जागा घेवून श्री समर्थ मटकी भेळ मिसळ पाव श्री समर्थ रेस्टॉरंट उभारले. आतापर्यंत सहा शाखा वडगाव मध्ये 3, तळेगाव दाभाडे, कार्ला व कामशेत मध्ये प्रत्येकी 1 अश्या 6 शाखा सुरू आहेत. महाराष्ट्रातून ग्राहक खास करून मटकी भेळ व मिसळ पाव खाण्यासाठी येतात. अनेक ठिकाणी तरुणांना उद्योगाचे मार्गदर्शन तसेच कायमच सामाजिक बांधिलकीतून गरीब गरजूंना मदतीचा हात देतात. मावळातील नव उद्योजकांचे मार्गदर्शक म्हणून ओळख निर्माण केली आहे.
संतोष भिलारे यांच्या संघर्षातून यशोशिखरावर असणारा संघर्ष जाणून घेवून डॉ. आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने उद्योग रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून शुक्रवारी (दि.3) नवी दिल्ली महाराष्ट्र सदन मध्ये दुपारी 1 वा वितरण करण्यात येणार आहे.