421 views
वडगाव मावळ दि.2 (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे युवा मंच यांच्या तर्फे मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या , सन्मानीय व्यक्तिमत्वांच्या मावळरत्न पुरस्कार सन्मान सोहळा भेगडे लॉन्स , वडगाव मावळ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या सन्मानमुर्तीं मध्ये , ह.भ.प.डॉ.सदानंद मोरे (संत साहित्य) , रामदास (आप्पा) काकडे (उद्योग) , ह.भ.प.बाळासाहेब महाराज काशीद (अध्यात्म) सूर्यकांतजी वाघमारे (समाजकारण) श्रीमती सुरेखाताई जाधव (समाजकारण) रामनाथशेठ वारिंगे (बैलगाडा क्षेत्र) सेजल विश्वनाथ मोईकर (क्रीडा) या सन्मानीय स्थानिक मावळवासीयांना समारंभपूर्वक गौरविण्यात आले.
सर्वच सन्मानार्थींनी कृतज्ञता व्यक्त करतानाच , रविंद्र भेगडे युवा मंचाचे आभार मानले.
याप्रसंगी , प्रतिक्रिया व्यक्त करताना रविंद्र भेगडे म्हणाले , "मावळ तालुका हा जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी या भूमीसाठी योगदान देऊन , मावळचा नावलौकिक वाढवला. याच ,विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या , सन्मानीय व्यक्तिमत्वांच्या गौरव करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने मावळरत्न पुरस्कार सन्मान सोहळा आज संपन्न होत आहे. वरील सन्मानीय मान्यवरांच्या कर्तुत्ववाने इतर जण प्रेरणा घेतील आणि मावळची घौडदौड अशीच कायम राहील "
याप्रसंगी माजी राज्यमंत्री मदनजी बाफना साहेब, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, पुणे जिल्हा काँग्रेस चे जेष्ठ नेते मा.पै.चंद्रकांतदादा सातकर ,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मा.श्री.बापूसाहेब आण्णा भेगडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मा.श्री.ज्ञानेश्वर दाभाडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.गणेश तात्या भेगडे , दूध संघाचे संचालक मा.बाळासाहेब नेवाळे , माव भाजपा अध्यक्ष श्री.दत्तात्रय गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.तालुकाध्यक्ष व जेष्ठ नेते मा.बबनराव भेगडे , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री.गणेश शेठ खांडगे, भाजपा जेष्ठ नेते निवृत्ती भाऊ शेटे, भाजपा जेष्ठ नेते एकनाथराव टीळे, मा.अध्यक्ष मावळ भाजपा प्रशांत आण्णा ढोरे, मा.सभापती गुलाब काका म्हाळसकर, विठ्ठलराव शिंदे, मा.उपसभापती शांताराम बापू कदम, प्रदेश भाजपा सदस्य जितेंद्र बोत्रे, प्रदेश भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, लोणावळा शहर भाजपा अध्यक्ष अरुण लाड , देहूरोड शहर भाजपा अध्यक्ष रविंद्र उर्फ लहुमामा शेलार,
यांच्यासह मावळ विधानभा मतदार संघातील सर्वपक्षीय पदाधिकारी , कार्यकर्ते ,महिला, नागरिक व रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच चे सर्व सन्माननीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते होते.