4386 views
वडगाव मावळ दि.12 (प्रतिनिधी) घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन करताना, वडील व मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला; ही घटना गुरुवारी (दि.12) सायंकाळी 6 वा. कडधे ता.मावळ जि.पुणे हद्दीत घडली. वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ व मावळ आपत्ती व्यवस्थापन आदींनी रात्री उशिरापर्यंत शोध घेऊन दोन्ही मृतदेह बाहेर काढले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संजय धोंडू शिर्के (वय 49) व आदित्य संजय शिर्के (वय 20) दोघे रा.बेडसे करूंज ता.मावळ असे मृत्यू झालेल्या वडील व मुलाचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कडधे हद्दीतील संजय शिर्के व आदित्य शिर्के यांनी घरगुती गणपती मूर्ती चे विसर्जन करण्यासाठी त्यांच्या घराच्या जवळ असलेल्या माळावर उत्खनन केलेल्या जागेत साचलेल्या पाण्यात गेले असता, मुलगा आदित्य शिर्के बुडत असताना, त्याचे वडील संजय शिर्के यांनी पाण्यात उडी घेतली असता, दोघेजण पाण्यात बुडाले.
कामशेत पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. मावळ आपत्ती व्यवस्थापन यांनी शोध घेत वडिल संजय शिर्के व मुलगा आदित्य शिर्के यांचे मृतदेह रात्री उशिरापर्यंत शोध घेत बाहेर काढले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मावळात सातव्या दिवशी शुक्रवारी (दि.13) गणेश मूर्ती विसर्जन असते, घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अनुचित घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी.
दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना केले आहेत.
या गुन्ह्याचा तपास कामशेत पोलीस करत आहे.