74 views
तळेगाव दाभाडे दि.16 (प्रतिनिधी) नवलाख उंबरे हद्दीतील रामेश्वर मंदिराजवळील (बेंच) बाकड्यावर अनोळखी पुरुष जातीचा अंदाजे वय 30 ते 35 वयाचा मृतदेह मिळून आल्याची घटना शनिवारी (दि.14) सकाळी 8 वा. नवलाख उंबरे ता.मावळ हद्दीत घडली.
मृतदेह तळेगाव दाभाडे जनरल हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता, हृदय विकाराने मृत्यू झाल्याचे घोषित केले.
मृतदेहाचे वर्णन पुढीलप्रमाणे उंची 5 फूट 6 इंच, रंग सावळा, बांधा सडपातळ, चेहरा गोल, नाक सरळ, डोळे काळे, डोकीचे केस काळे बारीक दाढी मिशी काळी वाढलेली, अंगात फिक्कट काळ्या रंगाचा फुल बह्याचा शर्ट तर नेसनीस काळ्या रंगाची पँट
वरील वर्णनाच्या व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब जगदाळे यांच्याशी संपर्क करा 9923461101