2194 views
पुणे दि.15 (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील 49 अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली असून मावळात 4 शाळा अनधिकृत आहेत. शिक्षण विभागाने पालकांना पाल्याचा प्रवेश घेताना सावधानतेचा इशारा दिला आहे. पालकांनो सावधान, तुमच्या मुलांचा अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नका, असं आवाहन जिल्हा परिषदेने केलं आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे व पिंपरी चिंचवड शहर, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून 49 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या अनधिकृत शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश न घेण्याचं आवाहन जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी
केले आहे.
अनधिकृत शाळांची यादी खालीलप्रमाणे:-
पुणे शहरात ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, नारायणा इ टेक्नो स्कूल, दि गोल्डन इरा इंग्लिश मीडियम स्कूल, फ्लोरिंग फ्लोरा इंग्लिश मीडियम स्कूल, इ. एम. एच. इंग्लिश मीडियम स्कूल, सी. टी. ई. एल. इंग्लिश मीडियम स्कूल, द टायगर इज इंटरनॅशनल स्कूल, मेरीगोल्ड इंटरनॅशनल स्कूल, शिव समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, दारुल मदिनाह स्कूल, टीम्स तकवा इस्लामिक स्कूल अँड मक्तब, लेगसी हायस्कूल, इमॅन्युअल पब्लिक स्कूल या अनधिकृत शाळा आहेत.
मावळ : मधील जीझस क्राईस इंग्लिश मीडियम स्कूल खामशेत, श्रेयान इंटरनॅशनल स्कूल साईनगर गहुंजे, व्यंकेश्वरा वर्ल्ड नायगाव, किंग्ज वे पब्लिक स्कूल रायवुड लोणावळा या शाळा अनधिकृत आहेत.
दौंड : तालुक्यात किडजी स्कूल, अभंग शिशू विकास, यशश्री इंग्लिश मीडियम स्कूल, हवेली : तालुक्यात रामदास सिटी स्कूल, श्रीमती सुलोचनाताई झेंडे बाल विकास मंदिर आणि प्राथमिक विद्यालय, खेड : तालुक्यामध्ये भैरवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल,
मुळशी : मध्ये रुडिमेंट इंटरनॅशनल स्कूल, एंजल इंग्लिश स्कूल, चाणक्य ज्युनिअर कॉलेज, इलाईट इंटरनॅशनल स्कूल, वीविद्या भवन इंग्लिश मीडियम स्कूल, महिंद्रा युनायटेड इंटरनॅशनल स्कूल, अंकुर इंग्लिश मीडियम स्कूल, पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, संस्कार प्रायमरी स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, एल.प्रो इंटरनॅशनल स्कूल, माउंट कासल इंग्लिश मीडियम स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल, सरस्वती विद्या मंदिर, पुरंदर : मधील श्रीनाथ इंग्लिश मीडियम अनधिकृत शाळा आहे.