1919 views
वडगाव मावळ दि.17 (प्रतिनिधी) विवाहित महिलेने मोबाईल नंबर न दिल्याच्या रागातून आरोपीने महिलेच्या पोटात चाकू भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि.17) सकाळी 8 वा. कान्हे-जांभूळ महिंद्रा cie कंपनीच्या गेट समोर मोकळ्या जागेत ता.मावळ जि. पुणे हद्दीत घडली. कलम 307, 506 अन्वये वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. जखमी महिलेवर वैद्यकीय उपचार सुरू
वडगाव मावळ दि.17 (प्रतिनिधी) विवाहित महिलेने मोबाईल नंबर न दिल्याच्या रागातून आरोपीने महिलेच्या पोटात चाकू भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि.17) सकाळी 8 वा. कान्हे-जांभूळ महिंद्रा cie कंपनीच्या गेट समोर मोकळ्या जागेत ता.मावळ जि. पुणे हद्दीत घडली. कलम 307, 506 अन्वये वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. जखमी महिलेवर वैद्यकीय उपचार सुरू.
लक्ष्मी माताप्रसाद वाल्मिकी वय 25 रा. जांभूळ ता.मावळ मुळगाव देवगाव ता.कोच जि. जालोन उत्तर प्रदेश जखमी महिलेचे नाव आहे.
संतोष मारुती लगली वय 43 रा.जांभूळ ता.मावळ आरोपीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी जखमी महिला लक्ष्मी वाल्मिकी व आरोपी संतोष लगली महिंद्रा cie कंपनीच्या कँटीन मध्ये एकत्रित काम करत आहेत. आरोपी संतोष लगली हा फिर्यादी लक्ष्मी वाल्मिकी कडे तिचा मोबाईल नंबर ची वारंवार मागणी करत होता. परंतु फिर्यादीने आरोपीला नकार दिला होता. याचाच मनात राग धरून सोमवारी (दि.17) सकाळी 8 वा. कान्हे-जांभुळ येथील महिंद्रा CIE कंपनीचे गेट समोरील मोकळ्या जागेत आरोपी संतोष लगली याने फिर्यादीच्या पोटावर चाकुने भोसकून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. जखमी महिलेवर सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक, पोलीस निरीक्षक कुमार कदम आदींनी भेट दिली. आरोपीला वडगाव मावळ पोलिसांनी अटक केली. मंगळवारी (दि.18) सकाळी वडगाव मावळ न्यायालयात हजर करणार आहेत.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक सांगळे करत आहेत.